आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पुण्यामध्ये ‘महाराष्ट्र प्रवर्तिनी पदवी’ चादर महोत्सव उत्साहात संपन्न

Spread the love

महाराष्ट्र जैन वार्ता

पुणे : जैन सकल संघ, पुणे जिल्हाच्या वतीने आयोजित चादर महोत्सवासाठी महाराष्ट्र सह देशभरातून जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प. पू. डॉ. प्रतिभाजी म. सा. यांची दीक्षा नांदेड महाराष्ट्र येथे झाली. तेव्हापासून ते आजपर्यंत त्यांची ५२ वर्षांची संयम यात्रा, १६ शिष्यांना दीक्षा देऊन देशभरात जैन धर्माचा प्रचार करण्याचा मार्ग दिला. महाराजांनी ४०००० हजार किलोमीटरचा पायी विहार करून अनेक राज्यात त्यांना विविध पदाने गौरवण्यात आले आहे आज पर्यंत ४० चातुर्मास करत जैन धर्म चा प्रसार आणि प्रचारासाठी त्यांचे कार्य खूप मोठे मानले जाते.

या कार्याची दखल घेत श्रमण संघ शिखर पुरुष आचार्य भगवंत प. पू. डॉ. शिवमुनिजी म. सा., महाराष्ट्र प्रवर्तक प. पू. श्री. कुंदनऋषीजी म. सा. यांच्या आज्ञेने प. पू. डॉ. प्रतिभाजी म. सा. यांना महाराष्ट्र प्रवर्तनी पद प्रदान करण्यात आले.

या शुभ मुहूर्ताचे औचित्य साधून पुण्यनगरीच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक भूमीमध्ये जैन सकल संघ पुणे च्या वतीने ‘चादर महोत्सवाचे’ आयोजन बुधवार दि २९ मे रोजी सकाळी ९ वाजता वर्धमान सांस्कृतिक केंद्र पुणे येथे करण्यात आले होते.

यावेळी देशभरातून आलेल्या मान्यवरांनी आदरची चादर आणि शुभेच्छा देऊन शब्द सुमनानी वर्षाव केले. महोत्सवात ५२ गुरु भगवंतांची उपस्थिती लक्षवेधी ठरली.कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष प्रकाश धारीवाल यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास राठोड यांनी केले. पुणे सकल संघाच्या वतीने अतिथी भवन उभारणी व गुरु भगवंत सेवा समिती स्थापन करण्याचा निर्धार केला. कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन सकल संघाचे पदाधिकारी विजयकांत कोठारी, पोपटलाल ओस्तवाल, विलास राठोड, बाळासाहेब धोका, अनिल नहार व सकल संघाचे सर्व सभासदानी केले.

get_footer();