आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पोलिस असल्याची बतावणी ; ज्येष्ठ नागरिकाला लुबाडले

Spread the love

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

पुणे : पोलिस असल्याची बतावणी करत चोरट्याने ज्येष्ठाच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून नेल्याची घटना येरवडा भागात घडली. याप्रकरणी चोरट्याविरोधात येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घिसुलाल डांगी (७०) यांची सोनसाखळी चोरीला गेली आहे. याबाबत हितेंद्र घिसुलाल डांगी (४२, रा. आदर्शनगर, येरवडा) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
येरवड्यातील आदर्शनगर परिसरात डांगी यांचे किराणा मालाचे दुकान आहे.

शनिवारी (दि. २९) सकाळी ५:३० च्या सुमारास डांगी यांचे वडील दुकानात होते. त्यावेळी एक चोरटा डांगी यांच्या दुकानात शिरला. त्याने मी पोलिस आहे घाबरू नका अशी बतावणी केली.

त्यानंतर दुकानात येऊन घिसुलाल यांच्या गळ्यातील ३५ हजारांची सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून, त्यांच्या तोंडावर रुमाल टाकून चोरून चोरटा पसार झाला.

get_footer();