आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पोलिस असल्याचे भासवून महिलेची २० लाखाची फसवणूक

Spread the love

पुणे : एका अनोळखीने मोबाईल वर महिलेशी संपर्क साधून आपण पोलिस बोलत असल्याचे भासवले, व त्यांच्याकडून आधार कार्ड, बँक खात्याची माहिती घेत २० लाखाची फसवणूक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कर्वेनगर येथील एका महिलेने या प्रकरणी वारजे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तुमच्या आधार कार्डव्दारे बेकायदेशररित्या व्यवहार होण्याची भीती आहे. तुमच्या बँकेचा लॉगीन आयडी व पासवर्ड पाठवा. घाबरु नका, मी पोलिस बोलतोय, असे अनोळखीने फोनवर सांगितले.

त्यामुळे त्यांनी बँक खात्याची माहीती त्याला दिली. त्याचा उपयोग करून त्या तोतया पोलिसाने बँक खात्यातून २० लाखाची रक्कम काढून फसवणूक केली आहे. हा प्रकार २ ते १८ जुलै दरम्यान घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. हा तपास पोलीस निरीक्षक मनोज शेंडगे करीत आहेत.

get_footer();