आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पोलीस पत्नीचा जीव घेण्याचा प्रयत्न : पतीला अटक

Spread the love

पुणे : पोलीस असलेल्या पत्नीच्या चारित्र्यांवर संशय घेवून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे.

या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला पोलीस दलात काम करीत आहेत, त्यांचा पती हर्षद विकास पानसरे (वय ३६ वर्ष रा. विश्रांतवाडी पुणे)खासगी नोकरी करतो. दोघेही पोलीस लाईन विश्रांतवाडी येथे राहण्यास आहेत.

२७ जुलै रोजी आरोपीने पोलीस पत्नीस मारहाण शिवीगाळ करून गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. असे फिर्यादी म्हटले आहे. पोलिसांनी हर्षद विकास पानसरे याला अटक केली आहे. हा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके करीत आहेत.

get_footer();