आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पोलीस शिपाई चालक संवर्गातील भरती सुरु

Spread the love

१९ जुन : पोलीस मुख्यालय येथे वेळेत उपस्थित रहा

महाराष्ट्र न्युज नेटवर्क

पुणे : पोलीस आयुक्त, पुणे शहर आस्थापनेवरील पोलीस शिपाई चालक संवर्गातील एकूण २०२ रिक्त पदे भरण्याकरिता १९ जूनपासून पासून पोलीस मुख्यालय, शिवाजीनगर, पुणे येथे भरती प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे.

भरतीसाठी पात्र सर्व उमेदवार यांनी ऑनलाईन आलेल्या प्रवेशपत्रावर दिलेल्या तारखेस भरती प्रक्रियेसाठी उपस्थित रहावे. उमेदवारांस देण्यात आलेल्या तारखेस उमेदवार भरती प्रक्रियेसाठी उपस्थित राहू शकला नाही, तर त्यास कोणत्याही परिस्थितीत तारीख बदलून दिली जाणार नाही अथवा दुसरी संधी उपलब्ध करुन दिली जाणार नाही.

तसेच उमेदवार यांनी भरती प्रक्रियेसाठी येत असताना आवेदन अर्जाच्या व आवश्यक त्या सर्व कागदपत्रांच्या छायांकीत/साक्षांकीत प्रतींचे ०२ सेट (दोन संच) व अलीकडच्या काळातील ०५ फोटो सोबत ठेवावेत. भरतीसाठी कोणाच्याही प्रलोभनाला बळी पडू नये.

जर कोणी व्यक्ती पोलीस भरती करुन देणेबाबत आमिष दाखवत असेल तर अशा व्यक्तींच्या भूलथापांना बळी न पडता सदर व्यक्तींबाबत दक्षता अधिकाऱ्यांना (व्हीजिलन्स ऑफिसर) कळवावे. योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

get_footer();