आवृत्ती पुणे
← Back to Homepage

प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठापने निमित्त भूम शहरात भव्य शोभायात्रा

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, Other, People, Social • January 22, 2024
Spread the love

भूम : अयोध्या रामजन्मभूमी येथे प्रभू श्रीराम प्राण प्रतिष्ठापना होत आहे. या आनंद उत्सवाच्या निमित्ताने भूम शहरात भव्य अशी शोभायात्रा काढून श्रीराम प्रभूंचा जयघोष केला .

या निमित्ताने ग्रामीण भागातील गावागावात वाड्यावर व भूम शहरातील घरोघरी मंगल अक्षदा वाटप केल्या आहेत . याशिवाय 21 जानेवारी 2024 रोजी शहराच्या प्रमुख मार्गाने भव्य अशी शोभायात्रा काढून प्रभू श्रीरामाचा जय घोष केला .
या दरम्यान शोभायात्रेमध्ये प्रभू श्रीराम की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय अशा विविध प्रकारच्या जयघोषाने परिसर अगदी दणाणून गेला होता. शोभा यात्रेमध्ये दांडपट्टा, तलवारबाजीच्या खेळाणी टाळ मृदंगाच्या गजरातील बाल वारकऱ्यांचा कार्यक्रम महिला राम भक्तांच्या फुगड्या धार्मिक गीतांनी वातावरण अगदी प्रसन्नमय झाले होते . शहराच्या अनेक मार्गावर रामभक्तांनी ठिकठिकाणी पुष्पवृष्टी केली. शोभा यात्रेचा समारोप पाच तासाच्या भव्य मिरवणूक नंतर प्रभू श्रीराम मंदिर येथे आरती व महाप्रसादाच्या वाटपानंतर समारोप करण्यात आला. मिरवणुकीसाठी ट्रॅक्टर ट्रॉलीवर भव्य अशी प्रभू श्रीरामांची मूर्ती व आयोधीतील प्रभू श्रीराम मंदिर प्रतिमा देखील राम भक्तांचे लक्ष वेधून घेतले. रस्त्यावर अनेक रामभक्त भगिनींनी विविध रंगी रांगोळी काढून प्रभू श्रीराम पादुकांचे घरासमोर रस्त्याच्या दोन्ही कडेला आकर्षक रंगीबेरंगी अशी रांगोळी काढून जवळपास 62 ठिकाणी प्रभू श्रीराम पादुकांचे पूजन केले . संपूर्ण शोभा यात्रेसाठी बाळासाहेब क्षिरसागर, संतोष सुपेकर, सचिन बारगजे, बाबासाहेब वीर, श्रीपाद देशमुख, हेमंत देशमुख, प्रसाद देशमुख, मनोज क्षिरसागर, सचिन क्षिरसागर, प्रदीप साठे, उदय कुलकर्णी, गणेश कुलकर्णी , पत्रकार शंकर खामकर, किरण कुलकर्णी, अशोक लोखंडे , संदीप खामकर , आबासाहेब मस्कर ,गणेश साठे , विनोद नाईकवाडी , विनायक नाईकवाडी , प्रसाद देशमुख , मुकुंद वाघमारे ,सचिन जाधवर , अमर सुपेकर ,अशोक आसलकर ,सुजित वेदपाठक , वैभव देवडीकर , शांतीराज बोराडेअशा असंख्य रामभक्तांनी तब्बल दोन दिवसाचा पूर्ण वेळ देऊन शोभायात्रा यशस्वी करण्याचा प्रयत्न केला. शोभा यात्रेच्या माध्यमातून भूम शहर अगदी प्रसन्नदायी झाले होते .

get_footer();