आवृत्ती पुणे
← Back to Homepage

प्रवाशांचे दागिने चोरणाऱ्या दोन महिला ताब्यात

Spread the love

पुणे : स्वारगेट एस.टी. स्टॅन्ड परिसरामध्ये गर्दीचा फायदा घेवुन प्रवाशांचे दागिनेचोरी करणाऱ्या दोन महिला चोरटयांना स्वारगेट पोलीसांनी जेरबंद केले आहे.

त्यांच्याकडून ३,५०,०००/- रु किंमतीचा सोन्याच्या दागिन्यांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. स्वारगेट एसटी स्टॅन्ड व पीएमपीएल बस स्टॅन्ड परिसरामध्ये अज्ञात चोरटे हे प्रवाशांची बसमध्ये चढण्यासाठी झालेल्या गर्दीचा फायदा घेवुन त्यांचे सोन्याचे दागिने चोरी करीत असल्याच्या घटना वारंवार घडत असल्याने पोलिस सतर्क होते.

स्वारगेट पोलीस स्टेशन कडील तपास पथकाचे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत संदे तसेच तपास पथकातील पोलीस अंमलदार सुजय पवार व संदीप घुले, यांनी स्वारगेट एसटी स्टॅन्ड परीसरातील सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासुन तांत्रीक विश्लेषनाद्वारे दोन संशयित महिला स्वारगेट एसटी स्टॅन्डमध्ये संशयितरित्या फिरत आहेत हे यांच्या लक्षात आले.

वरिष्ठांनी कायदेशीर कारवाई चे आदेश देताच त्यावरुन तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी बातमीचे ठिकाणी जावुन पाहणी केली. तेथे फिरणाऱ्या दोन्ही महिलांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने सदर महिलांना महिला पोलीस अंमलदार यांचे मदतीने ताब्यात घेतले. त्यांचेकडे चौकशी करुन त्यांना अटक करण्यात आली आहे.

तपासा दरम्यान त्यांचेकडुन स्वारगेट पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या ०३ गुन्हयामधील चोरीस गेलेल्या एकुण ५० ग्रॅम वजनाचे ०३,५०,०००/- रु किंमतीचा सोन्याच्या दागिन्यांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

सदरची कामगिरी नंदिनी वग्यानी सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक. दिलीप फुलपगारे, स्वारगेट पोलीस स्टेशन, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गीता बागवडे यांच्या आदेशान्वये तपास पथकातील सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत संदे, पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले, सुजय पवार, संदीप घुलेहर्षल शिंदे, रमेश चव्हाण, प्रविण गोडसे, अनिस शेख, शिवा गायकवाड, फिरोज शेख, दिपक खंदाड, स्मिता सिताप, व सुनिता घामगळ यांनी एकत्र मिळुन केली आहे.

get_footer();