आवृत्ती पुणे
← Back to Homepage

प.पु.प्रतिभाकंवरजी म.सा.महाराष्ट्र प्रवर्तीनी पदी विराजमान

Spread the love

सकल जैन समाज पुणे च्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन : महाराष्ट्र जैन वार्ता फेसबुक पेजवर LIVE कार्यक्रम

महाराष्ट्र जैन वार्ता

पुणे : कर्नाटक केशरी प.पू.गणेशलालजी म.सा.यांच्या सुशिष्या,कोटा संघ प्रमुखा प.पु.प्रतीभाकंवरजी म.सा.यांना श्रमण संघाचे आचार्य प.पु.शिवमुनीजी म.सा.,महाराष्ट्र प्रवर्तक कुंदनऋषीजी म.सा.यांच्या आज्ञेने महाराष्ट्र प्रवर्तीनी पद देण्यात आले आहे.

त्यांचा मानाची चादर देऊन पुणे जिल्हा सकल जैन समाजाच्या वतीने सन्मान करण्यात येणार आहे. सकल जैन समाज पुणे जिल्हा चे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, विजयकांत कोठारी, विलास राठोड, बाळासाहेब धोका, अनिल नहार यांनी व सर्व पदाधिकारी यांनी मिळून या ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन २९ मे रोजी सकाळी ९ वाजता वर्धमान सांस्कृतिक केंद्र बिबवेवाडी येथे केले आहे.

या कार्यक्रमासाठी सर्वानी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सकल जैन समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. महाराष्ट्र जैन वार्ताच्या फेसबुक पेजवर हा ऐतिहासिक कार्यक्रम LIVE दाखवला जाणार आहे.

get_footer();