आवृत्ती पुणे
← Back to Homepage

प. पु. प्रवीणऋषिजी म. सा. यांना चातुर्मासाची विनंती

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta, MJW - Social News, MJW Daily News(Post Slider), News Slider, Other, People, Social • February 24, 2024
Spread the love

पिंपरी चिंचवड सकल जैन श्रावक संघाचा पुढाकार

पुणे : युवामनिषी उपाध्याय प. पू . श्री प्रवीणऋषिजी म. सा. यांनी २०२५ चा चातुर्मास करावा अशी विनंती पिंपरी चिंचवड सकल जैन श्रावक संघाच्या वतीने करण्यात आली. यावेळी सर्व संघांच्या विनंतीवर योग्य वेळी निर्णय घेतला जाईल असे सांगितले.

जैन समाजातील जेष्ठ संत, प्रखर वक्ता, मानवसेवेच्या अनेक उपक्रमा़ंचे प्रेरणा स्त्रोत, युवामनीषि उपाध्याय प.पू.श्री. प्रवीणऋषिजी म. सा. यांच्या दर्शनासाठी पिंपरी चिंचवड मधील 13 जैन श्रावक संघाचे अध्यक्ष आणि पदाधिकारी असे एकूण 40 सदस्य कोपरगाव येथे दिनांक 22 फेब्रुवारी रोजी पोहोचले.

यावेळी प. पू. प्रवीणऋषिजी म.सा. आणि प.पू. तीर्थेशऋषीजी म.सा. यांचे दर्शन घेऊन सर्वांनी त्यांच्याशी संवाद साधला. प.पू. प्रवीणऋषिजी म.सा. हे रायपूरचा येथील चातुर्मास संपन्न करून पुण्यनगरीत येणार आहेत.

तत्पूर्वी पिंपरी चिंचवड च्या भक्ती शक्ती नगरीमध्ये भोसरी येथे दिनांक २० मार्च रोजी त्यांचे स्वागत होईल व नंतर चिंचवड स्टेशन येथे 24 मार्च रोजी होळी चातुर्मासाचा कार्यक्रम तसेच १ एप्रिल रोजी निगडी प्राधिकरण येथे वर्षीतप धारणा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमांसाठी पिंपरी चिंचवड मधील जैन श्रावक, श्राविका मोठ्या संख्येने हजर राहतील असे सकल जैन श्रावक संघाच्या प्रतिनिधींनी सांगितले.

या दर्शन यात्रेमध्ये प्रा.डॉ. अशोककुमार पगारिया, नितीन बेदमूथा, दिलीप नहार, सुवालाल बोरा, दिलीप भन्साली, संतोष गुगळे, सुभाष ओसवाल, राजेंद्र चोरडिया, वीरचंद बागमार, राजेंद्र कर्नावट, राजेंद्र बोरा, अशोक लुंकड, गणेश चोरडिया, अशोक नहार, अशोक मंडलेचा, शांतीलाल गांधी, कांतीलाल पटवा, गिरीश बाफना, संदीप फुलफगर, विजय कटारिया, प्रवीण गांधी, महावीर सोनिमिंडे, प्रवीण भन्साली, पारस लुंकड, सुनील कोठारी, रमण शिंगवी, अनिल कुचेरिया, सतीश बोथरा, राहुल बोरा ,संदेश गदिया, गणेश मुथा, संदीप दोशी, मनीष गदिया, सचिन सोनीग्रा हे सर्व सदस्य उपस्थित होते.

कोपरगाव संघाचे अध्यक्ष संजय भंडारी व त्यांच्या कमिटी सदस्यांनी उपस्थितांचे स्वागत केले व शेवटी महाराजसाहेबांनी मंगलपाठ दिला.

get_footer();