आवृत्ती पुणे
← Back to Homepage

प.पू.श्री आनंदऋषीजी म.सा. यांच्या पुण्यतिथी निमित्त आरोग्य तपासणी शिबिर

Spread the love

पुणे : ‘सामाजिक बांधिलकी हेच आमचे ध्येय’ या ब्रीदवाक्यखाली आणि उपाध्याय श्री. पुज्य गौतममुनीज़ी म.सा. यांच्या प्रेरणेने मानव सेवेचे कार्य ‘आनंद दरबार’ दत्तनगर येथे सुरू आहे.

परमपूज्य राष्ट्रसंत आचार्य भगवंत आनंदऋषीजी महाराज साहेब यांच्या १३२ व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने गुरु आनंद मेडिकल सेंटरची सेवा सुरू करण्यात आली असून याद्वारे मोफत पुरवली जाणार आहे. पुण्यतिथीच्या निमित्ताने दात, डोळे, मोतीबिंदू ऑपरेशन, होमिओपॅथिक, ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग बीपी शुगर वजन आदींसह विविध तपासण्या मोफत करण्यात आल्या.

या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून परिसरातील गरजू नागरिकांनी याचा लाभ मोठ्या प्रमाणात घेतला. पुण्यतिथी कार्यक्रमाप्रसंगी पंडितरत्न पूज्य राजेशमूनीजी म.सा. आदि ठाणा २, ऊपप्रवर्तनी पूज्य चंदनबालाजी म. सा., पूज्य पद्मावातीजी म.सा आदि ठाणा ७ यांच्या पावन सानिध्यात धर्मसभेत राष्ट्रसंत आचार्य भगवंत पूज्य श्री आनंदऋषिज़ी म.सा ची ३२ वी पुण्य तिथि संपन्न झाली.

यावेळी आनंद दरबारचे अध्यक्ष बाळासाहेब धोका, संदीप बेलदरे, पल्लवी जगताप, विजय भोर उपस्थित होते. शिबिरात कोठारी डायग्नोपिनचे डॉ. चोरडिया, एच.व्ही. देसाई आय हॉस्पिटल, डॉ. अकान्स, डॉ. अंकिता धोका, डॉ. अर्चना गादिया, डॉ. वृषाली मेहेत्रे, शतायू हॉस्पिटल, डॉ. मोनिका भंडारी, डॉ. करिष्मा मुथा यांनी रुग्ण सेवा दिली.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुभाष पिरगळ, अभय सुराणा, ऐश्वर्या कोठारी, आदित्य भंडारी, ऐश्वर्या पितळे, कुणाल सुराणा, प्रतीक चोरडिया आदींसह आनंद दरबार ट्रस्टच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

get_footer();