आवृत्ती पुणे
← Back to Homepage

रवींद्र वायकर ४८ मतांनी विजयी

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Social News, News, Social • June 5, 2024
Spread the love

सर्वाधिक मतांनी ओमराजे निंबाळकर यांचा विजय

मुंबई : लोकसभा निवडणुकीत राज्यात ४८मतदारसंघात यावेळी कमालीची चुरस पाहायला मिळाली. वायव्य मुंबई मतदार संघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांचा अवघ्या ४८ मतांनी पराभव केला.

पोस्टल मतामध्ये वायकर यांनी अवघ्या ४८ मतांनी बाजी मारली.अमोल किर्तीकर यांना ०४,५२,५९६ मते मिळाली. तर वायकर यांना ०४,५२,६४४ मते मिळाली आहेत. सर्वाधिक मतांनी ओमराजे यांचा विजय धाराशीव मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी राज्यात सर्वाधिक मतांच्या ०३,२९,८४६ फरकाने विजय मिळवला आहे.

त्यांनी अजित पवार गटाच्या अर्चना पाटील यांचा पराभव केला. ओमराजे यांना ०७,४८,७५२ तर पाटील यांना ०४१८,९०६ मते मिळाली. राज्यात सात महिला खासदार निवडणुकीत राज्यात वेगवेगळ्या पक्षाच्या सात महिला विजयी झाल्या.

यामध्ये सुप्रिया सुळे यांनी बारामतीत विजयाचा चौकार मारताना त्यांच्या भावजयी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यावर तब्बल दीड लाखाच्या मतांच्या फरकाने विजय मिळवला.
कॉंग्रेसच्या चौघी विजयी झाल्या. त्यामध्ये प्रणिती शिंदे (सोलापूर), शोभा बछाव (धुळे), वर्षा गायकवाड (उत्तर मध्य मुंबई), प्रतिभा धानोरकर (चंद्रपूर) यांचा समावेश आहे.

भाजपच्याखडसे रक्षा खडसे (रावेर), स्मिता वाघ (जळगाव) विजयी झाल्या आहेत.

लाखाच्या फरकाने विजयी उमेदवार

१)गोवाल पाडवी(कॉंग्रेस,नंदुरबार) २)संजय जाधव(ठाकरेगट,परभणी) ३)नितीन गडकरी(भाजप,नागपूर)
४)कल्याण काळे(कॉंग्रेस,जालना) ५)मुरलीधर मोहोळ ( भाजप,पुणे) ६)संदीपान भुमरे (शिवसेना, संभाजी नगर)
७)सुप्रिया सुळे (शरद पवार गट,बारामती) ८) धैर्यशील मोहिते पाटील (शरद पवार गट,माढा) ९)नामदेव किरसान (कॉंग्रेस,गडचिरोली)
१०)भास्कर भगरे (शरद पवार गट, दिंडोरी) ११)अमोल कोल्हे (शरद पवार गट, शिरूर) १२)राजाभाऊ वाजे(ठाकरेगट,नाशिक)
१३)हेमंत सावरा(भाजप,पालघर) १४)नागेश पाटील (ठाकरेगट,हिंगोली) १५)श्रीमंत शाहू महाराज(काँग्रेस,कोल्हापूर)

दोन लाखाच्या फरकाने विजयी
१)नरेश मस्के(शिवसेना शिंदे गट) २) स्मिता वाघ (भाजप, जळगाव) ३)रक्षा खडसे(भाजप,रावेर)
४)प्रतिभा धानोरकर(कॉंग्रेस,चंद्रपूर) ५)श्रीकांत शिंदे ( शिवसेना शिंदे गट,कल्याण)

तीन लाखाच्या फरकाने विजयी
१)पियुष गोयल(भाजप,उत्तर मुंबई) २)ओमराजे निंबाळकर (ठाकरे गट धाराशिव)

get_footer();