आवृत्ती पुणे
← Back to Homepage

फरासखाना पोलिसांनी मोबाईल चोरणारा पकडला

Spread the love

५५ मोबाईल, लॅपटॉप पोलिसांनी केले जप्त

पुणे : शहरात मोबाईल चोरणारा पोलिसांनी पकडला असून त्याच्याकडून तब्बल ५५ मोबाईल व एक एच.पी. कंपनीचा लॅपटॉप असा किंमत ६,२०,०००/- रू चा मुद्देमाल फरासखाना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फरासखाना पोलीस स्टेशन अंकित गाडीतळ पोलीस चौकी येथील पो. अमंलदार अकबर कुरणे यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, रेल्वे भरावाजवळ, शाहीर अमर शेख चौकातील सिग्नलजवळ, मंगळवार पेठ, पुणे येथे एक छत्री व पेन विकाणारा इसम वय अंदाजे ३० वर्ष, याचेकडे भरपुर मोबाईल फोन आहेत.

हे फोने तो कमी किमतीत विकत आहे. सपोनि गायकवाड यांनी तातडीने पथकासह शाहीर अमर शेख चौक, रेल्वे भराव जवळ, मंगळवार पेठ, येथे धाव घेतली असता तेथे बातमीदाराने सांगितलेल्या वर्णनाप्रमाणे एक इसम मिळुन आला. त्याचे नाव संतराम सुग्रीव खलदी (वय ३० वर्ष, रा. खाल्दी, तहसिल किसनगंज, जि. वारा, राज्य राजस्थान) असे असल्याचे त्याने सांगितले.

तेच्या हातामध्ये एक मोबाईल फोन होता त्या मोबाईल फोन बाबत त्याचेकडे विचारपुस केली असता त्याने त्याबाबत उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्याच्यावरील संशय वाढला. फुटपाथवरील त्याच्या बॅगेची तपासणी करता त्यामध्ये एक एच.पी. कंपनीचा लॅपटॉप, ४९ एन्ड्रॉईड मोबाईल फोन, ०५ साधे किपॅड असलेले विविध कंपन्यांचे फोन व त्याचे कडे असलेल्या एकुण ५५ मोबाईल फोन त्यांची एकुण किंमत ६,२०,०००/- रू. अंदाजे मिळून आले.

पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त केला आहे. सदरचे मोबाईल फोन हे त्याने पुणे शहरातुन विविध ठिकाणाहुन चोरी केले असल्याचीत माहिती मिळाली असुन त्याचे इतर साथिदारांचा शोध सुरु आहे.
सदरची कामगिरी पोलीस उप-आयुक्त परि-१ संदीपसिंग गिल्ल, सहा. पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग मच्छिंद्र खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक. प्रशांत भस्मे, पोलीस निरिक्षक (गुन्हे) अजित जाधव, सहा. पोलीस निरिक्षक वैभव गायकवाड, सपोफौ, प्रशांत शिंदे, पोलीस अंमलदार गुरव, अकबर कुरणे, बनकर, सुर्वे यांनी केली आहे.

get_footer();