आवृत्ती पुणे
← Back to Homepage

फिनटॅक्स वेल्थच्या वतीने 50 मुलींना सायकलीचे वाटप

Spread the love

पुणे : फिनटॅक्स वेल्थ संचालक संजय गांधी यांच्या आर्थिक सहाय्यातून नगर जिल्ह्यातील मिरी या गावी रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल मधील 50 मुलींना सायकलचे वाटप करण्यात आले. ज्या मुली चार ते पाच किलोमीटर शाळेमध्ये चालत येतात, वस्तीवरून दूर शेतातून चालत येतात अशा 50 मुलींना गांधी परिवारातर्फे आणि मदत म्हणून 50 सायकलींचे वाटप मिरी येथे शाळेमध्ये करण्यात आले. हा कार्यक्रम शाळेचे प्राचार्य ढोले सर, शाळा कमिटीचे कारभारी गवळी, ग्रामस्थ व रयत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. यावेळी दहावी व बारावी मध्ये दरवर्षी पहिल्या येणाऱ्या विद्यार्थ्याला संजय गांधी यांचे वडील स्वर्गीय संपतलालजी गांधी यांच्या नावाने एक पुरस्कार यावर्षीपासून विद्यार्थ्यांना देण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली.

get_footer();