आवृत्ती पुणे
← Back to Homepage

बँक कर्मचारी असल्याचे भासवून फसवणुक

Spread the love

पुणे : बँकेचा कर्मचारी असल्याचे भासवून दुचाकी परत देण्यासाठी ३७ हजार रुपये घेऊन फसवल्याची घटना गंगाधाम परिसरात घडली आहे.

या प्रकरणी एका ५७ वर्षाच्या नागरिकाने मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार कोंढवा खुर्द येथे राहणाऱ्या फिर्यादी यांनी सुझुकी कंपनीची टूव्हिलर गाडी विकत घेतली असुन ८१ हजार रुपयेचे बँकेचे लोन घेतले होते.

लोनचे हप्ते थकले असल्याचे सांगुन आपण बँकेचा कर्मचारी असल्याचे भासवुन फिर्यादी यांची सुझुकी कंपनीची टूव्हिलर गाडी ही जबरदस्तीने त्यांच्या ताब्यातुन घेतली. गाडी परत करण्याकरीता फिर्यादी कडुन वेळावेळी एकुण ३७,७००/- रुपये खंडणी स्वरुपात स्वीकारुन फिर्यादी यांची फसवणुक केलेली आहे.

get_footer();