आवृत्ती पुणे
← Back to Homepage

बंद घर फोडून दीड लाखाच्या सामानाची चोरी

Spread the love

महाराष्ट्र न्युज नेटवर्क

पुणे : घराला लावलेले कुलूप तोडून घरातील सुमारे दीड लाख रुपयांचा एेवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना अभिनव कॉलेज रोड नऱ्हे येथे घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना १८ व १९ जुन या काळात घडली आहे. फिर्यादी स्वप्नील निंबाळकर (वय ३१ वर्षे रा. नऱ्हे .पुणे) हे श्री. अॅव्हेन्यु बिल्डींग बी. विंग, फ्लॅट नं. २१०, अभिनव कॉलेज रोड, नऱ्हे येथिल घराला लॉक लावुन पाहुण्यांकडे गेले होते.

त्यावेळी कोणीतरी अज्ञात इसमाने दरवाजाचे लॉक कशाचेतरी सहाय्याने उचकटुन दरवाजे वाटे आत प्रवेश केला व कपाटाचे लॉकर तोडुन त्यामध्ये ठेवलेले रोख २०,०००/- रु. सोन्याचे दागिने किचनमधील मिक्सर व हॉलमधील एलईडी टीव्ही असा एकुण १,४४,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेला आहे.

get_footer();