आवृत्ती पुणे
← Back to Homepage

बारा वर्षाच्या मुलाचे पैशासाठी अपहरण

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, Other, People, Police • February 20, 2024
Spread the love

पोलीसांकडून सहा तासांच्या आत मुलाची सुखरुप सुटका

पुणे : बारा वर्षाच्या मुलाचे पैशासाठी अपहरण करण्यात आले होते. मात्र पोलीसांना सहा तासांच्या आत मुलाची सुखरुप सुटका करण्यात यश आले आहे. ही कामगिरी भारती विद्यापीठ पोलीसांनी केली आहे.

फिर्यादी यांच्या बारा वर्षाच्या मुलाचे भिलारवाडी कात्रज येथुन आरोपी राजेश शेलार याने त्याच्या चारचाकी गाडीमधुन सांयकाळीच्या सुमारास अपहरण केले. त्याने मुलाला सोडण्याच्या बदल्यात ७० लाख रुपयांची पैशाची मागणी केली. तसेच पोलीसांत तक्रार केली तर मुलाच्या जीवाचे बरे वाईट करण्याची धमकी दिली.

फिर्यादी यांनी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. घटनेचे गांभीर्य पाहुन पोलीस उपआयुक्त परि २, पोलीस उपआयुक्त, सहायक पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग यांनी घटनास्थळी भेट देऊन मुलाची सुखरुप सुटका व आरोपीचा शोध घेण्याबाबत सुचना केल्या. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन यांनी तीन वेगवेगळी तपास पथके तयार केली.

तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीबाबत मिळालेल्या माहितीनुसार सातारा दिशेने पथके रवाना झाली. यातील अपहरण झालेल्या मुलाचा व आरोपींचा शोध घेत असताना तांत्रिक माहितीनुसार आरोपी हा अपहरण मुलास घेऊन पाटेघर, जि. सातारा येथील डोंगरामध्ये लपला आहे अशी माहीती मिळाली.

त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस व गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकांनी स्थानिक सातारा एल.सी.बी कडील अरुण देवकर व त्यांचा पोलीस स्टाफ याच्या मदतीने संपुर्ण डोंगर परिसर पिंजुन काढला. आरोपीला पोलीस आल्याची चाहुल लागल्याने त्याने अपहरण मुलांस डोंगरात अंधारामध्ये पळुन घेऊन जाऊ लागला. तेव्हा पोलिसांनी मुलाला सुखरुप ताब्यात घेतले.

अशा प्रकारे पोलीसांनी एका रात्रीत तपास करुन एक लहान मुलाची आरोपीकडून सुखरुप सुटका करुन लहान मुलाचे प्राण वाचविले आहे. आरोपी फरार असुन त्याचा पोलीस पथके शोध घेत आहेत. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलीस उपआयुक्त परिमंडळ २ स्मार्तना पाटील, पोलीस उपआयुक्त गुन्हे शाखा अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग नंदीनी वग्याणी यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मंगल मोडवे, सहायक पोलीस निरीक्षक समीर कदम, पोलीस उप निरीक्षक धिरज गुप्ता, आणि गुन्हे शाखा, युनिट २. पुणे शहरचे अमोल रसाळ व त्यांच्या कडील पोलीस स्टाफ यांनी केली आहे.

get_footer();