आवृत्ती पुणे
← Back to Homepage

बार्शीतील गुणवंत विद्यार्थ्यांनी संपादन केले घवघवीत यश

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, Other, People, Social • February 16, 2024
Spread the love

बार्शी : देशभर घेण्यात आलेल्या (एनएमएमएस) NMMS परीक्षेमध्ये बार्शी शहरातील सुप्रसिद्ध शाळा सुलाखे माध्य. व उच्चमाध्यमिक हायस्कूल येथील गुणवंत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

या शाळेतील एकून ३० गुणवंत विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. एनएमएमएस (NMMS) म्हणजेच नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप ही एक प्रकारची शिष्यवृत्ती आहे जी इयत्ता ८ वी नंतर पात्र विद्यार्थ्याला त्याच्या पुढील शिक्षणासाठी दिली जाते.

या मधून वार्षिक साधारण १२ हजार रुपये मुलांना स्कॉलरशिप मिळते. या क्षेत्रातील सर्वात जास्त रक्कम देणारी स्कॉलरशिप आहे.

तसेच आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे अधिकार प्रदान करणे हे या योजने मार्फत सरकारचे उद्दिष्ट आहे. अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक स्वामीराव हिरोळीकर यांनी दिली.

या सर्व विद्यार्थ्यांनचे उत्तम यशाबद्दल बार्शी एज्युकेशन सोसायटी बार्शी या संस्थेचे अध्यक्ष आनंद सुलाखे, सचिव अनंत कवठाळे व सर्व शिक्षक-कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

get_footer();