आवृत्ती पुणे
← Back to Homepage

बार्शीमध्ये दहा वर्षांपासून चातुर्मासात होतेय ‘विनाकारण’ अन्नदान

Spread the love

२५०० जणांनी घेतला आस्वाद, महिलांची उपस्थिती

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

बार्शी : मागील दहा वर्षांपासून अखंडितपणे बार्शी मध्येविनाकारण भोजन हा अन्नदानाचा विधायक उपक्रम राबवण्यात येत आहे. बार्शीत रविवारी अडीच हजार जणांनी भोजनाचा आस्वाद घेतला.

चातुर्मासाच्या पूर्वी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मागील दहा वर्षांपासून ही अन्नदानाची सेवा करण्यात येते. (स्व.) अमृत व (स्व.) विलास गुगळे यांच्या बंधू प्रेमाची अन्नदान करण्याची या वर्षी दशकपूर्ती झाली. जुन्या पिढीतील बार्शीचे नगराध्यक्ष स्व. चांदमल गुगळे यांच्या प्रेरणेने गुगळे परिवाराच्या वतीने अन्नदान करण्यात येते.

बार्शीच्या उद्योग व सराफ व्यवसायिक असलेले चांदमल गुगळे यांचे सुपुत्र स्व. अमृतलाल उर्फ बाबांनी विनाकारण भोजन या अन्नदान उपक्रमाची सुरुवात २०१४ मध्ये केली. मागील काही वर्षांपूर्वी अमृतलाल बाबांचे अकस्मात निधन झाले.

त्यानंतर ही अन्नदानाची परंपरा गुगळे परिवारातील युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते शशांक, दर्शन व अतुल व गुगळे परिवारातील सदस्यांनी सेवा सुरू ठेवत रविवारी (दि. ७) विनाकारण भोजनासाठी नागरिकांना निमंत्रित केले.

त्यामध्ये २५०० जणांनी आस्वाद घेतला. कोरोना महामारीतही स्व. अमृतलाल बाबांनी कोरोना काळात शहरात बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना व अधिकारी वर्गाला दोन वेळचा नाश्ता दिला. नागरिकांना घरपोच मिठाई वाटप करत अन्नदानाचा हा विधायक उपक्रम सुरू ठेवला.

रविवारी (दि. ७ ) चांदमल गुगुळे परिवाराने ने आयोजित केलेल्या भोजनाचा विविध स्तरातील नागरिकांनी महिलांनी उपस्थित राहून आस्वाद घेतला. अमृतलाल बाबांच्या निधनानंतरचा त्यांच्या गैरहजेरीत चांदमल गुगळे परिवाराने आयोजित केलेल्याया नियोजनबध्द व उत्साहात पार पडला, असे अन्नदानाचे संयोजक शशांक गुगळे यांनी सांगितले.

get_footer();