आवृत्ती पुणे
← Back to Homepage

बार्शी वकील संघ अध्यक्षपदी काकासाहेब गुंड

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, Other, People, Social • January 25, 2024
Spread the love

उपाध्यक्षपदी संभाजी गलांडे विजयी

बार्शी : बार्शी न्यायालयात वकील म्हणून काम करीत असलेल्या बार्शी बार असोसिएशनच्या २०२४ ते २०२५ या वर्षासाठी विविध पदासाठी निवडणूक होऊन त्यात अध्यक्ष पदासाठी ॲड. काकासाहेब गुंड यांची यांची ९ तर उपाध्यक्षपदी ॲड. संभाजी गलांडे यांची २ मतांनी निवड झाली आहे.

अध्यक्ष पदासाठी ॲड. काकासाहेब गुंड याना १५२ मते, तर त्याचे प्रतिस्पर्धी ॲड. प्रवीण करंजकर याना १४३ मते मिळाली. तर, उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेले गलांडे याना ९४, तर त्यांचे प्रतिस्पर्धी विशाल गोनेकर याना ९२ व मुजाहिद तांबोळी यांना ४४, सोमनाथ काशीद यांना ५८ मते पडली. सचिवपदी ॲड. अक्षय आनंद
पाटील निवड व खजिनदार पदी ॲड. दत्तप्रसाद घोगरे यांची बिनविरोध निवड तर लायब्ररी चेअरममपदी ॲड. अविनाश गायकवाड, तसेच व्यवस्थान समितीच्या सदस्यपदासाठी ॲड. भगवंत पाटील ॲड. शामकुमार झालटे, ॲड. पद्माकर काटमोरे व ॲड. दैवशाला जाधवर या चौघांचेच अर्ज दाखल झाल्याने यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीसाठी बार असोसिएशनचे एकूण ३१७ मतदारांपैकी २९७ वकील मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असल्याची माहिती निवडणूक अधिकारी ॲड. एस.एन शेटे यांनी सांगितले. यावेळी मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून ॲड. एस.एन.शेटे, सहायक निवडणूक अधिकारी ॲड. एस. एच. नायकोजी व सहायक निवडणूक अधिकारी म्हणून ॲड. टी. के. शहा यांनी काम पाहिले.

get_footer();