आवृत्ती पुणे
← Back to Homepage

‘बालवाटिका’ प्रकल्पाचे भव्य उद्घाटन

Spread the love

पुणे : ‘दि पुना गुजराती केळवणी मंडळ’च्या मातृभाषा संवर्धन व लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘बालवाटिका’ प्रकल्पाचे उद्घाटन आज मोठ्या उत्साहात पार पडले. हा उपक्रम केवळ शैक्षणिक नव्हे, तर संस्कृतीशी नाळ जोडणारा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

उद्घाटन समारंभात संस्थेचे चेअरमन राजेश शहा, सेक्रेटरी हेमंत मणियार, सह-सेक्रेटरी प्रमोद शहा, तसेच व्यवस्थापक राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका उर्मिला पटेल, हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्या अनुजा सेलैट, इंग्रजी प्रायमरी व हायस्कूलच्या प्राचार्या अर्चना धारू, आणि प्री-प्रायमरीच्या प्राचार्या नेहा सावंत यांचीही उपस्थिती लाभली. पालक, विद्यार्थी व शिक्षकवृंद यांचीही मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

या प्रकल्पाच्या माध्यमातून गुजराती मातृभाषेचे संवर्धन आणि लहानग्यांच्या भाषिक, सामाजिक व बौद्धिक विकासाला चालना देण्याचा संस्थेचा उद्देश आहे. बालवाटिका ही केवळ शिक्षणाचे केंद्र न राहता, संस्कृतीचे बीज रोवणारी एक उपक्रमशील वाटचाल ठरणार आहे.

“भविष्यातील पिढीला आपल्या मूळ भाषा-संस्कृतीशी जोडणारा हा प्रयत्न सातत्याने पुढे नेला जाईल,” असा विश्वास संस्थेने व्यक्त केला आहे. वर्षभर या प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक सर्व पाठबळ दिले जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले.

get_footer();