आवृत्ती पुणे
← Back to Homepage

बिट मार्शलने वाचवले आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे प्राण

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, Other, Police • January 23, 2024
Spread the love

मुंढवा बिट मार्शलच्या प्रयत्नांना आले यश

पुणे : आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या वैफल्यग्रस्त तरुणाचे प्राण वाचविण्यात मुंढवा बिट मार्शल यांना यश आले आहे.

मुंढवा पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील घोरपडी बिट मार्शल ड्युटी कर्तव्यावर असणारे पोलीस अंमलदार प्रविण होळकर व जगदीश महानवर यांना नियंत्रण कक्ष, पुणे शहर कडून डायल-११२ द्वारे रात्रौ १० वाजण्याच्या दरम्यान फोन आला. निगडेनगर, लेन-७, बी.टी. कवडे रोड, घोरपडी, येथे एक वैफल्यग्रस्त व्यक्ती आत्महत्या करीत असल्याचा पोलीसांना मदतीचा फोन आला. त्या अनुषंगाने तात्काळ घोरपडी बिट मार्शल पोलीस अंमलदार यांनी या ठिकाणी जाऊन आत्महत्या करीत असलेल्या व्यक्तीस ताब्यात घेतले. घोरपडी पोलीस चौकीस घेऊन आले. त्यानंतर चौकी अंमलदार सहायक पोलीस फौज रासकर यांनी त्याला आधार देऊन समजावून सांगुन शांत केले.
या व्यक्तीला आत्महत्या करण्याच्या अनुषंगाने विचारपुस केली असता, त्याने माझा घरगुती कौटुंबिक प्रॉपट्री वाद चालू असल्याने, मला खुप त्रास होत आहे म्हणून मला आत्महत्याशिवाय दुसरा पर्याय नाही असे सांगितले. त्याची माहिती पोलीस अंमलदार यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांना दिली. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याच्या नातेवाईकांना संपर्क करुन पोलीस चौकीस बोलावून घेण्यात आले. त्यांच्या वाद-विवादाच्या अनुषंगाने चर्चा करुन, त्याच्या तक्रारीचे निरासन करुन त्याची माहिती त्या व्यक्तीस समजावून सांगितल्यामुळे त्याचे आत्महत्येपासून मन परिवर्तन झाले व त्याने आत्महत्या करणार नसल्याचे सांगितले.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशीक विभाग रंजनकुमार शर्मा पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-५ ए. राजा, सहायक पोलीस आयुक्त हडपसर विभाग अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक, (गुन्हे) सुनिता रोकडे यांनी केली आहे.

get_footer();