आवृत्ती पुणे
← Back to Homepage

बिल्डींगमध्ये चोरी करणाऱ्या महिला आरोपीला केले जेरबंद

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, Other, People, Police, Social • February 15, 2024
Spread the love

कोंढवा पोलीसांची कामगिरी

पुणे : किरकोळ भांडणाच्या रागातुन बिल्डींगमध्ये चोरी करणाऱ्या महिला आरोपीला जेरबंद करण्यात आले आहे. कोंढवा पोलीसांनी ही कामगिरी केली आहे.

सलमा शेख (वय २४ वर्षे, रा. कोंढवा) हिला ताब्यात घेण्यात आले आहे. तिच्याकडून दागिने जप्त करण्यात आले आहे.

फिर्यादी यांचे घर बंद असताना घराचे लॉक अज्ञात चोरट्याने उघडले. बेडरुम मधील कपाटातील सोन्याचे मंगळसुत्र, रोख रक्कम असा एकुण ३७,००० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी करुन नेला.

या गुन्हयातील फिर्यादी यांच्याकडे गुन्हयाच्या अनुषंगाने तपास करीत असताना घराची चावी घराच्या बाहेर ठेवत होता का, तसेच त्याच्याकडे घरी नेहमी बिल्डींगमधील कोण कोण गप्पा मारण्यासाठी येत होते, तसेच त्याचे दागिने घरात कोठे ठेवता याबाबत कोणाला माहिती होती, तसेच त्याचे कोणाशी वाद झालेले आहेत का, त्याच्या घराची चावी कोणाकडे ठेवण्यासाठी देता का, किंवा त्याचे घराचे कुलूप कोणाला वापरण्यासाठी दिले होते का याबाबत तपास केला.

त्यांनी त्याच्या बिल्डींग मध्ये फ्लॅट नं.२०२ मध्ये राहणारी महिला सलमा शेख हिने तिच्या घराला लावण्यासाठी कुलूप नेले असल्याचे, तसेच तिला घरात कोठे दागिने ठेवत असल्याची माहिती असल्याचे सांगितले.

या संशयीत महिला हिला पोलीस ठाणे येथे बोलावुन कौशल्यपुर्ण तपास केला. तिने फिर्यादी यांच्या सोबत वाद झाले होते. त्यामुळे रोजी फिर्यादी यांच्या घराची चावी त्यांनी बाहेर ठेवल्याचे माहिती असल्याने ती घेऊन घरात जावुन कपाट उघडुन चोरी केल्याचे कबुल केले.

महिल्याच्या घराची घरझडती घेतली असता चोरी केलेले दागिने तिच्या घरातील बंद वॉशिग मशीनमध्ये लपवुन ठेवल्याचे मिळुन आल्याने ते जप्त करण्यात आले आहे. सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पुर्वे प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त. परि.०५ आर राजा, सहायक पोलीस आयुक्त, वानवडी विभाग शाहुराव साळवे कोंढवा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मानसिंग पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, दिनेश पाटील, पोलीस अंमलदार अमोल हिरवे, शहिद शेख, संतोष बनसुडे, लक्ष्मण होळकर, अभिजीत रत्नपारखी, जयदेव भोसले, विकास मरगळे, राहुल थोरात, सुहास मोरे, अभिजीत जाधव, आशिष गरुड, रोहित पाटील यांनी केली आहे.

get_footer();