आवृत्ती पुणे
← Back to Homepage

बेकायदेशीरपणे गांजाविक्री करणाऱ्याला पकडले

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, People, Police • February 7, 2024
Spread the love

11 लाख 47 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

सोलापूर : मौजे तांदुळवाडी येथे अंमली पदार्थ गांजा बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्या आरोपीला पकडण्यात यश आले आहे. सोलापूर पोलिसांनी ही कामगिरी केली आहे.

आकाश सोनकडे,(वय 22 रा. सिद्धेश्वर साखर कारखान्या च्या पाठीमागे सोणकडे वस्ती होटगी दक्षिण सोलापूर), आकाश काळे (रा.सिद्धेश्वर साखर कारखाना जवळ कुंभारी रोड वीट भट्टी जवळ सोलापूर) अशी आरोपींची नावे आहेत. ताब्यात घेतलेल्या व्यक्तीकडुन 4 लाख 77 हजार रूपये किंमतीचा 23 कि.लो 850 ग्रॅम गांजा, 20 हजार रूपये किंमतीचा वीवी कंपनीचा मोबाईल हॅन्डसेट, 6 लाख 50 हजार रूपये किंमतीची स्वीप्ट कार असा एकूण 11 लाख 47 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल अंमली पदार्थ गांजा बेकायदेशीरपणे विक्री करण्याचे उद्देशाने जात असताना हस्तगत करण्यात आला आहे. सोलापूर तालुका पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी नामदेव शिंदे, स्वप्नील ईज्जपवार, सत्यजित आवटे व पोलीस स्टाफ असे पोलीस ठाण्याच्या हद्दीत आगामी लोकसभा निवडणुक -2024 च्या अनुषंगाने पाहिजे / फरारी आरोपीची माहिती घेत होते. तसेच अंमली पदार्थाची विक्री व वाहतुक करणा-या लोकांची माहिती काढुन रेड टाकण्याकरीता पेट्रोलिंग करीत होते. त्यांना मौजे तांदुळवाडी येथील एस. एम.ट्रेडर्स, आडत दुकानासमोरील रोडवर एक व्यक्ती त्याच्या ताब्यातील स्वीप्ट चारचाकी (पाठीमागील काच फुटलेली) वाहनाजवळ संशयितरित्या हालचाल करीत असताना दिसुन आला होता.
त्या व्यक्तीकडे काहीतरी संशस्यापद वस्तु किंवा अंमली पदार्थ असल्याचा संशय पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना आला. ते सर्वजण सरकारी वाहनातुन खाली उतरून त्याच्याजवळ जात असताना तो पोलीसांना पाहुन घाबरून पळुन जाऊ लागला. त्याचा पाठलाग करून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारपूस करून त्याच्या ताब्यातील स्वीप्ट कारची तपासणी केली असता त्याच्या कारच्या डिक्कीत एका काळया रंगाचे प्लॅस्टिकचे पोते बांधलेल्या अवस्थेत दिसुन आले होते. त्या पोत्याची पाहणी केली असता त्यामध्ये हिरवट, काळसर, फुले व फळे आलेला शेंड असलेला उग्र वास येणारा ओलसर गांजा दिसुन आला. तो गांजा असल्याची खात्री झाल्याने स्वीप्ट कारच्या डिक्कीतुन 4 लाख 77 हजार रूपये किंमतीचा 23 कि.लो 850 ग्रॅम गांजा अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आला आहे.
या ठिकाणाहुन एका व्यक्तीला ताब्यात घेतले असून त्याच्यासोबत असलेला दुसरा व्यक्ती पोलीस पथक येण्यापुर्वीच तेथुन निघुन गेला होता. नेमणुक सोलापूर तालुका, पोलीस ठाण्याचे शरद ढावरे, यांनी अंमली पदार्थ गांजा बेकायदेशीरपणे विक्री करण्याच्या उद्देशाने आपल्या कब्जात बाळगलेल्या परिस्थितील मिळुन आले म्हणुन 2 आरोपींविरुद्ध सोलापूर तालुका, पोलीस ठाणेस दिलेल्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्हयाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील ईज्जपवार हे करीत आहेत. ही कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस फौजदार विवेक सांजेकर, पोलीस हवालदार श्रीराम आदलिंग, शरद ढावरे, रहीम सय्यद, संतोष लोहार, पोलीस नाईक लाला राठोड, असिफ शेख, पोलीस अंमलदार किशोर सलगर व वैभव सुर्यवंशी यांनी बजाविली आहे.

get_footer();