आवृत्ती पुणे
← Back to Homepage

ब्राम्हण समाजावर हल्ल्याची धमकी देणाऱ्यांवर कारवाईची मागणी

Spread the love

भूम तालुका ब्राम्हण संघटनेतर्फे निवेदन

भूम : राज्यात असलेल्या ब्राम्हण समाजास सामुहिक हत्या करुन संपविण्याची भाषा करण्याऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी भूम तालुका ब्राम्हण संघटनेच्या वतीने दि १ मार्च रोजी उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत अधिक माहिती युट्युबच्या माध्यमातुन व इतर काही चॅनलच्या माध्यमातून अज्ञात व्यक्तींनी ब्राम्हण समाजाची सामुहिक हत्या करुन ३ मिनीटात संपवु अशी भाषा वापरली आहे. यामुळे समाजामध्ये भीतीचे वातावरण आहे.

संबंधित व्यक्तीने ५ पेक्षा जास्त लोक जमवून संपविण्याची धमकी दिल्याचे निवेदनात म्हटले आहे. या घटनेचा तपास करुन भविष्यात असा प्रकार होवु नये यासाठी कडक अंमलबजावणी करून संबंधितांवर गुन्हा करावा अशी मागणी भूम तालुका ब्राम्हण संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

यावेळी तालुका अध्यक्ष सुधिर देशमुख , शहर अध्यक्ष संजय शाळु, प्रशांत देवडीकर, अमोल तुळशी, हेमंत देशमुख, श्रीराम मुळे, मुसांडे काका, वैभव देवडीकर बाळासाहेब बेलसरे, रत्नाकर आरगडे, सचिन बारगजे, श्रीकृष्ण पाटील, सचिन वैद्य , श्रीपाद देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.

get_footer();