आवृत्ती पुणे
← Back to Homepage

भगवान महावीरांचा २६२३ वा जन्मकल्याणक आकुर्डीत उत्साहात साजरा

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta, MJW - Social News, MJW Daily News(Post Slider), News, News Slider, Social • April 22, 2024
Spread the love

भगवान महावीरांच्या जय घोषणी उद्घोषाने उद्योग नगरी दुमदुमली

आकुर्डी: आकुर्डी निगडी प्राधिकरण श्री संघ, निगडी प्राधिकरण, श्री संघ, युवक- युवती मंडल यांच्या संयुक्त विद्यमाने आकुर्डी स्थानक भावनात विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून जन्म कल्याणक उत्साहात साजरा करण्यात आला.

गवान महावीरांच्या प्रतिमेचे सजविलेल्या रथावर टिळक चौक (निगडी) पालखी प्रवेशद्वार दत्तवाडी, विठ्ठलवाडी, आकुर्डी, खंडोबा माळ विवेकनगर मार्गे स्थानक भवनात आगमन झाले. समाजातील असंख्य भाविक मिरवणुकीमध्ये उत्साहाने सहभागी झाले होते. भगवान महावीरांच्या उद्घोषाने व पथ गायनाने उद्योग नगरी दुमदुमली.

स्थानक भवनात पाठशाळेच्या बालकांद्वारे विविध सांस्क्रुतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. महावीर मुथा व डॉ. राहुल कटारिया यांच्या नेतृत्वाखाली रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ५० रक्तदात्यांनी रक्तदान केले.

यावेळी मावळचे खासदार आप्पासाहेब श्रीरंग बारणे व नारायण बहिरवडें यांनी स्थानकभवनात भगवान महावीरांच्या प्रतिमेस वंदन केले व समाजबांधवांना शुभेच्छा दिल्या. पाठशाळेच्या शिक्षिका मनीषा जैन, पल्लवी नहार, सोनल सोनी यांनी पाठशाळेच्या बालकांकडुन पथनाट्यांची तयारी करुन घेतली.

सुवक मंडळाच्या वतीने तुषार मुथा, रोहित फिरोदिया, आनंद गांधी, धनेश मुथा, प्रसाद फिरोदिया, योगेश सोनिमिंडिया, सौरभ बेदमुथा, संकेत जैन, रोहन मुनोत, रोहित मुनोत, विजय सोनी, पवन बोहरा, संदेश छाजेड, सागर छाजेड, जयकुमार ओस्तवाल, पराग मुथा, करण मांडोत, अरिहंत राका, गगन चंगेडिया, प्रज्ञेश गांधी आदिंनी नियोजन केले. पुजा भंसाली, माधुरी भंसाली, चेतना मुथा, निता फिरोदिया यांनी स्तवन गायन केले. प्रास्ताविक संघाध्यक्ष सुभाष ललवाणी यांनी केले.

सूत्रसंचालन मनीषा जैन यांनी केले. नितीन बेदमुथा, संतोष कर्नावट, शारदा चोरडीया यांनी मनोगत व्यक्त केले. जवाहर मुथा यांनी आभार मानले. सुर्यकांत मुथीयान यांनी मतदान करण्याची शपथ दिली. श्री संघाच्या सर्व आजी माजी पदाधिकार्यानी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सुंदर नियोजन केले. आकुर्डी निगडी प्राधिकरण श्री संघाचे ज्येष्ठ सदस्य विठ्ठलदास कर्नावट परिवारातर्फे गौतम प्रसादीचे आयोजन करण्यात आले होते.

get_footer();