आवृत्ती पुणे
← Back to Homepage

भगवान महावीर जन्मकल्याणक दिनी सुट्टी न देणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याची मागणी

Spread the love

पुणे : भगवान महावीर जन्मकल्याणक (जयंती) दिनी सर्व शाळा व शैक्षणिक संस्थांना सुट्टी देणे बंधनकारक करावे तसेच सुट्टी न देणाऱ्या संस्थांवर योग्य ती कारवाई करावी, अशी ठाम मागणी अरिहंत जागृती मंच, पुणे यांनी केली आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षण आयुक्तांना निवेदन देण्यात आले असून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

तीर्थंकर भगवान महावीर जन्मकल्याणक दिवशी भारत सरकार व महाराष्ट्र राज्य सरकारकडून सार्वत्रिक सुट्टी जाहीर केली जाते. जैन समाज हा अल्पसंख्याक समाज असून या समाजाच्या धार्मिक सण-उत्सवांसाठी संपूर्ण वर्षात ही एकमेव अधिकृत सुट्टी असते.

मात्र काही शाळा व शैक्षणिक संस्था, विशेषतः इंग्रजी माध्यमाच्या संस्था, या दिवशी सुट्टी देत नसल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे. यासाठी मागील वर्षी अरिहंत जागृती मंच, पुणे यांच्या वतीने महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला होता.

त्यावेळी मा. शिक्षण उपसंचालक, पुणे विभाग यांनी एक पत्रक प्रसिद्ध केले होते. त्या पत्रकाच्या आधारे मंचाने सुट्टी न देणाऱ्या शाळांना निवेदन देऊन सुट्टी देण्याची विनंती केली होती. त्याचा सकारात्मक परिणाम होऊन पुणे शहरातील इंग्रजी माध्यमाच्या तीन शाळांनी पहिल्यांदाच भगवान महावीर जन्मकल्याणक दिनी सुट्टी जाहीर केली होती.

यावर्षी भगवान महावीर जन्मकल्याणक (जयंती) दिनांक ३१ मार्च २०२६ रोजी आहे. त्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व शाळा व शैक्षणिक संस्थांनी त्या दिवशी सुट्टी द्यावी, यासाठी अरिहंत जागृती मंच, पुणे यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

या निवेदनात शासनाने अधिकृत पत्रक काढून राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना सुट्टी देण्याचे आदेश द्यावेत तसेच ज्या संस्था किंवा शाळा सदर दिवशी सुट्टी देणार नाहीत, त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी स्पष्ट मागणी करण्यात आली आहे.

या निवेदनावर महाराष्ट्र राज्य शिक्षण आयुक्त यांनी सकारात्मक प्रतिसाद देत याबाबत योग्य कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. यावेळी अरिहंत जागृती मंचाचे अध्यक्ष राजेंद्र सुराणा यांच्यासह श्रीपाल ललवाणी, नितीन जैन, विजय पारख, जवाहर गुमते, संतोष भंसाळी आणि नितीन शहा उपस्थित होते.

← Back to Homepage

भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त विविध सांस्कृतिक-सामाजिक कार्यक्रम

Spread the love

श्री जैन सामुदायिक उत्सव समितीच्या वतीने आयोजन

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल

पुणे : श्री जैन सामूदायिक उत्सव समितीच्या वतीने रविवार दिनांक 21.4 2024 रोजी भगवान महावीरांच्या प्रतिमेची भव्य मिरवणुक, शोभा यात्रा आयोजित केलेली आहे. या निमित्ताने विविध सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

ही शोभायात्रा सकाळी 7.15 वाजता श्री गोडीजी पार्श्वनाथ मंदीर फूलवाला चौक येथुन प्रारंभ होऊन बोहरी आली, लक्ष्मी रोड, वसोनिया मारुति चौक येथे दर वर्षी प्रमाणे महापौर, खासदार, आमदार, नगरसेवक, सामाजिक धार्मिक क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर भगवान महावीरच्या प्रतिमेंला हार घालतील.

मिरवणुक गणेश पेठ ,रामोशी गेट, सेवन लव्ज चौक, मुकुंद नगर, सतारा रोड होऊंन आदिनाथ स्थानक येथें समाप्त होईल. भव्य टू व्हीलर रॅलीचे सायंकाळी 4 वाजता आयोजन करण्यात आलेले आहे. श्री दादावाड़ी जैन मंदिर येथून ही रॅली सुरु होऊन गोयल गार्डन गंगाधाम चौक येथे समाप्त होईल.

मंगलवार 23.4.24 रोजी सायंकाली जय जिनेंद्र प्रतिष्ठान नाजुश्री गंगाधाम चौक येथे मल्टी मीडिया धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. प्रसिद्ध कवि शैलेश लोढ़ा यांचे भगवान महावीर जीवन चरित्र वर उद्बोधन होणार आहे. भगवान महावीरांच्या उपदेश, जन्म, मृत्यु, मोक्ष मिछामिदुक्कडमवर सुभाष डांग हे नृत्य नाटिका सादर करणार आहेत.

महिलांच्या पुढाकाराने हजारों दिव्यांची महाआरती होणार आहे. तसेच आकर्षक गरबा नृत्यचे देखील आयोजन केले आहे. या कार्यक्रमाचे प्रायोजक माणिकचंद ग्रुपचे प्रकाश रसिकलाल धारीवाल आहेत. रविवार 21 अप्रैल रोजी विविध मंडळांच्या पुढाकाराने रक्तदान शिविर, आरोग्य शिबीर, मरणोत्तर नेत्रदान शिबीर, चारा वितरण, वृद्धाश्रम, अनाथाश्रम येथे अन्नदानाचे वाटप आदी सामाजिक कार्यक्रम आयोजित केले आहेत.

सन 1952 पासुन समाजाचे चारही संप्रदाय तीर्थंकर भगवान महावीर स्वामी चा जन्म कल्याणक महोत्सव दर वर्षी मोठ्या उत्साहने साजरा करतात याही वर्षी उत्साहात हा महोत्सव साजरा होईल, अशी माहिती श्री जैन सामूदायिक उत्सव समितीचे अध्यक्ष अचल जैन, सचिव अनिल गेल्डा, संपत जैन प्रचार प्रमुख, सतीश शह कोषाध्यक्ष, समीर जैन यांनी दिली.

get_footer();