आवृत्ती पुणे
← Back to Homepage

भगवान महावीर स्वामी जन्म कल्याणक पर भव्य शोभायात्रा

Spread the love

पुणे : भगवान महावीर स्वामी के जन्म कल्याणक के अवसर पर पूरे जैन समाज में हर्ष और उत्साह का माहौल देखने को मिला।

श्री श्वेतांबर जैन मूर्तिपूजक संघ, माणिक बाग की ओर से महावीर स्वामीजी के जन्मदिवस पर चांदी की पालकी में भगवान को विराजित कर भव्य शोभायात्रा निकाली गई। यह यात्रा बड़े ही हर्षोल्लास और श्रद्धा के साथ आयोजित की गई।

इस अवसर पर जैन धर्म के भक्तिसुरी समुदाय की साध्वीजी भाग्यनिधि महाराज साहेब सहित कुल 9 साध्वीजी उपस्थित रहीं। साथ ही पुणे की महापौर मंजूषा नागपुरे तथा श्री संघ के कई मान्यवर भी कार्यक्रम में शामिल हुए।

भगवान महावीर स्वामी की पूजा-अर्चना के बाद शोभायात्रा मंदिर से प्रारंभ होकर गोयलगंगा सोसाइटी, खाऊ गली, अमृतगंगा, सह्याद्री हाइट्स होते हुए गोयलगंगा सिग्नल मार्ग से पुनः माणिक बाग मंदिर में संपन्न हुई।

संघ के अध्यक्ष भरत भुरट ने बताया कि हर वर्ष श्वेतांबर और दिगंबर समाज मिलकर पालकी यात्रा निकालते हैं, लेकिन इस वर्ष तिथियों में अंतर होने के कारण दोनों समाजों ने 30 और 31 तारीख को अलग-अलग आयोजन किए। इस दौरान जैन समाज द्वारा सिंहगढ़ रोड पर टू-व्हीलर रैली भी निकाली गई।

उत्सव के दौरान समाज के लोगों के लिए बूंदी के लड्डू, ठंडा पानी और रस की व्यवस्था की गई। इस शोभायात्रा में भरत भुरट, सुहास शाह, दिनेश मुथा, सुरेश विनायकिया, संतोष दोषी, संजय शाह, तेजस मर्चेंट, विपुल बागरेचा, राजमल विनायकिया, मोतीलाल सालेचा, नितिन विनायकिया सहित समस्त जैन समाज के पदाधिकारी उपस्थित रहे।

← Back to Homepage

भगवान महावीर स्वामी जन्म कल्याणक निमित्त विविध कार्यक्रम

Spread the love

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ

बार्शी : जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर श्री भगवान महावीर स्वामींचा २६२३ वा जन्म कल्याणक दिवस व या निमित्त सकल जैन समाजाच्या बांधवानी विविध सांस्कृतिक, सामाजिक व धार्मिक कार्यक्रमाद्वारे हा दिवस उत्साहात साजरा केला.

जैन श्वेतांबर ऋषभदेव मंदिरापासून भगवान महावीरांची प्रतिमा फुलांनी आकर्षकरीत्या सजवलेल्या रथात ठेवून शहरातील प्रमुख मार्गाने शोभायात्रा काढण्यात आली. भगवान श्री महावीरांचा जन्मोत्सवा निमित्त स्व.पन्नालाल मोहनलाल श्रीश्रीमाळ परिवार यांच्या वतीने समाज बांधवांना सालाबाद प्रमाणे महाप्रसाद करण्यात आले.

शोभायात्रेनंतर मुनिराज श्री प्रियंकरप्रभ महाराज यांनी उपस्थितांना प्रवचन दिले. यावेळी आमदार राजेंद्र राऊत यांनी जैन समाजाला शुभेच्छा देताना म्हटले की जैन समाज हा शांतताप्रिय समाज असून या समाजाचा देशाच्या अर्थ व्यवस्थेमध्ये सिंहाचा वाटा आहे.

त्याचप्रमाणे माजी आमदार दिलीप सोपल यांनी मनोगत व्यक्त करत असताना बार्शी जैन समाजाच्या वतीने 2016 व 2019 च्या दुष्काळाच्या वेळी 40 गावांना रोज टँकर द्वारे मोफत पाणी पुरवठा केला असल्याची आठवण करून दिली.

दरम्यान गौतम लब्धि फाउंडेशन यांच्यावतीने वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात ५१ रक्त बाटल्यांचे संकलनही श्रीमान रामभाई शहा रक्तपेढीच्या साह्यायाने करण्यात आले. जिवदया जैन झुणका भाकरी केंद्र, महावीर धर्मार्थ दवाखाना, श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालय, ऋषभदेव जैन मानवसेवा संस्थेच्या वतीने डोळे तपासणी व मोतीबिंदु शस्त्रक्रिया मोफत उपचार करण्यात येते.

श्री. नवकार जैन सेवातीर्थ गोरक्षणमध्ये कत्तल खाण्याकडे जाणाऱ्या भाकड २५० गायींचे सांभाळ करणे असे विविध उपक्रम हे वर्ष भर जैन समाजाच्या वतीने राबण्यात येत आहे. यावेळी श्वेतांबर संप्रदायाचे परम पूज्य मुनिराज श्री. प्रियंकरप्रभ विजयजी आदी ठाणा २ महाराज व परम पूज्य साध्वी श्री वात्सल्यरत्ना श्रीजी आदि ठाणा ४ यांचे शुभ सानिध्य लाभले.

यावेळी शोभयात्रेमध्ये माननीय आमदार राजेंद्र राऊत, माजी मंत्री दिलीप सोपल, भाऊसाहेब आंधळकर, माजी नगराध्यक्ष असिफ तांबोळी आदी उपस्थिती लाभली जन्मोत्सव कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रदीप बागमार, धन्यकुमार शाह, जयचंद सुराणा, बाळासाहेब श्रीश्रीमाळ, सुभाष लोढा, महेश बाफना, प्रवीण मांडवकर, अनिरुद्ध अन्नदाते, शैलेश वखारीया, राहुल कुंकूलोळ, पवन श्रीश्रीमाळ, राहुल दोशी व जैन समाजाच्या युवकांचे योगदान राहिले.

get_footer();