आवृत्ती पुणे
← Back to Homepage

भरधाव कारने दुचाकीला उडवले, दुचाकीस्वार ठार

Spread the love

महाराष्ट्र न्युज नेटवर्क

पुणे : भरधाव कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने कार गतिरोधकावरून (स्पीड ब्रेकर) उडून रस्त्याच्या विरूद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला धडकली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला, तर एक जण जखमी झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आळंदी रस्त्यावरील आर्मी पब्लिक स्कूल समोर शुक्रवारी पहाटे अडीच वाजता हा अपघात घडला. स्वप्नील प्रदीप खरबडे (वय २६, रा. गजानन महाराजनगर, दिघी) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.

कारचालक सतीश तुकाराम वाळके (रा. दिघी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी जखमी प्रतीक सुरेश चांदारे (वय २१, रा. दिघी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक चांदारे आणि स्वप्नील खरबडे दोघे मित्र असून, एकाच परिसरात राहतात. खरबडे यांच्या वडिलांचे छत्र लहानपणी हरपले.

येत्या रविवारी स्वप्नीलच्या विवाहासाठी स्थळ पाहण्यासाठी कुटुंबीय जाणार होते. स्वप्नील याच्या पश्चात आई, लहान भाऊ आणि बहीण आहे. भूक लागल्याने दोघे दुचाकी घेऊन पुणे स्टेशनकडे निघाले होते.

या दरम्यान, पहाटे दोन वाजता पुणे स्टेशनवरील सर्व हॉटेल बंद झाल्याने दोघे पुन्हा घरी जाण्यासाठी निघाले. आळंदी रस्त्यावरून दिघीकडे जात असतांना आळंदीहून विश्रांतवाडीकडे येणाऱ्या भरधाव कारचे आर्मी पब्लिक स्कूल समोरील गतिरोधकावर नियंत्रण सुटले आणि कार विरूद्ध दिशेने जाणाऱ्या दुचाकीवर आदळली.

कारचालक फरार आहे. हा तपास सहा. पोलीस निरीक्षक अन्सार शेख करीत आहेत.

get_footer();