आवृत्ती पुणे
← Back to Homepage

भरधाव कार खाली चिरडून युवकाचा मृत्यू

Spread the love

पुणे : येरवडा गोल्फ क्लब समोर भरधाव कार खाली चिरडून युवकाचा मृत्यू झाला.

काल दुपारी एकच्या सुमारास हा अपघात झाला. पहिल्या कारच्या धक्याने त्याची दुचाकी रस्त्यावर पडली. त्याचवेळी मागून आलेल्या कार खाली तो आला. कारचालक अपघाताची खबर न देता पळून गेला. अपघातात केदार मोहनराव चव्हाण (वय ४१, रा. मोहन नगर, धनकवडी पुणे) याचा मृत्यू झला आहे.

येरवडा पोलिसांनी कार चालकावर मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक अमर कदम तपास करीत आहेत.

get_footer();