आवृत्ती पुणे
← Back to Homepage

भरधाव जीपच्या धडकेने दुचाकीस्वार ठार

Spread the love

महाराष्ट्र न्युज नेटवर्क

पुणे : पुणे सोलापुर रस्त्यावर हडपसर गाडीतळ ब्रीज जवळ, दुर्वांकुर मोबाईल शॉपीच्या समोर जीपच्या धडकेने दुचाकीस्वार ठार झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १८ जुन रोजी रात्री १०:३० च्या सुमारास हा अपघात झाला आहे. या अपघातात तुषार महादेव कांबळे (वय २७ वर्षे, रा. उन्मेष हौसिंग सोसायटी, गाडीतळ, हडपसर) हा गंभीर जखमी झाला होता. परंतु जीप चालक न थांबता पोलिसांना खबर न देता पळून गेला.

त्यानंतर उपचार सुरु असतांना तुषार कांबळे मयत झाला. गेल्या महिन्या भरात पुणे शहर परिसरात वाहनाचे अपघात मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. पोलीस उप निरीक्षक हसन मुलानी तपास करीत आहेत.

get_footer();