आवृत्ती पुणे
← Back to Homepage

भरधाव टॅकरने सायकलवरील मुलाला चिरडले

Spread the love

लोहगाव खांदवेनगर झेडपी शाळेजवळची दुर्घटना

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

पुणे : भरधाव टॅकरने एक दहा वर्षाच्या मुलाला चिरडल्याची घटना लोहगाव हद्दीत खांदवेनगर येथे घडली आहे. सात जून रोजी रात्री पावणे नऊ च्या सुमारास हा अपघात झाला आहे.

या अपघातात सायकल वरून जात असलेल्या सोहम सुनील देढे या दहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. अपघाता नंतर वाहन चालक कोणतीही मदत न करता, अपघाताची खबर न देता पळून गेला.

दशरथ जाधव (वय २६ वर्षे रा. लोहगाव, पुणे) यांनी फिर्याद दाखल केली होती. विमाननगर पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चालक अनिल मारुती राठोड (वय २९ वर्षे रा. सदगुरु प्लाटजवळ, खांदवेनगर, पुणे) याला अटक करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक चेतन भोसले यांनी पळून गेलेल्या चालकाला शिताफीने अटक केली.

get_footer();