आवृत्ती पुणे
← Back to Homepage

भाजी खरेदी करताना धक्का लागल्याने तरुणाला मारहाण

Spread the love

पुणे : बाजारात भाजी खरेदी करताना धक्का लागल्याने वाघोलीतील एका तरुणाला तिघांनी मारहाण केल्याची घटना वाघोलीतील दुर्गामाता मंदिर परिसरात घडली आहे.

या प्रकरणी एका तरुणाने लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला फिर्यादी व त्यांचा भाऊ हे असे भाजी खरेदी करण्यासाठी जात असताना फिर्यादीच्या खांदयाला धक्का दिला म्हणुन पाहुन चालत जा असे तो म्हणाला.

त्याचा राग मनात धरुन त्या ठिकाणी इसमा सोबत असणारे इतर तरुणांनी फिर्यादी व त्यांचे सोबत असलेल्या इतर त्यांचे सहकारी असे तिघांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यांचेकडील गाडीमध्ये जबरदस्तीने घालुन त्यांचे अपहरण केले.

दूरवरठिकाणी नेवुन गाडीचे नुकसान झाले आहे असे सांगुन त्याबदल्यात पैशाची मागणी करुन १८,०००/- रू. गुगल पे अकाउंटवर जबरदस्तीने घेवुन मोबाईल जबरदस्तीने हिसकावुन घेतला. पोलिसांनी तक्रार दाखल होताच शुभम नथुराम जाधव (वय २४ वर्षे, रा. वाघोली) आनंद हनुमंत पाटील (वय १९ रा. वाघोली) यांना अटक केली आहे.फरार आरोपींचा शोध सुरु आहे. हा तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) निलेश जगदाळे करीत आहेत.

get_footer();