आवृत्ती पुणे
← Back to Homepage

भुम मध्ये सर्व पक्षीय नेते भगवान बाबा चरणी

Spread the love

आमदार,खासदार दोघांनीही दिला नीधी

भूम : भूम तालुक्यातील सोनगिरी येथे राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना व कलश रोहण कार्यक्रम भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्या हस्ते करण्यात आला.

सोनगिरी येथे ग्रामस्थांच्या सहभागातून भव्य असे मंदिर उभारण्यात आलेले आहे. या कार्यक्रमास पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

या कामासाठी पालकमंत्री तानाजी सावंत यांच्याकडून 10 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत यांनी दिली. तर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी देखील या कामासाठी 10 लाख निधी देण्याचे जाहीर केले.

या कार्यक्रमास सर्व पक्षातील प्रमुख राजकीय नेते मंडळींनी हजेरी लावली होती. यावेळी माजी आमदार राहुल मोटे, माजी जी.प सदस्य धनंजय सावंत, भुमचे माजी नगराध्यक्ष संजय गाढवे, शिवसेना महिला जिल्हाध्यक्ष अर्चना दराडे, माहिला शिवसेना जिल्हाध्यक्ष जिनत सय्यद, भाऊसाहेब मारकड, डॉ चेतन बोराडे, भगवान बांगर, बालाजी कुटे उपस्थित होते.

यावेळी देवाच्या कामात तरी येथील सर्व नेते मंडळी एकत्र येताना दिसली. पुढील काळात भागातील विकास कामांमध्ये आडकाठी न आणता हीच मंडळी एकत्र दिसली तर हे चित्र खूप सुंदर असेल.

get_footer();