आवृत्ती पुणे
← Back to Homepage

भूममध्ये आजपासून आदर्श रास्ता रोको

Spread the love

भूम : मराठा समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी प्रतिक पेट्रोल पंप जवळ परंडा रोड येथे आदर्श रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

सकल मराठा समाजाच्या वतीने शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेण्यात आली. आंदोलनाची पुढील दिशा जाहीर केली असून यामध्ये २४ फेब्रुवारीपासून शहरातील जिजाऊ चौकात ‘आदर्श रास्तारोको आंदोलन सुरु केलं आहे.

तसेच हे आंदोलन सकाळी १०.३० ते दुपारी १:०० करण्यात आले. हे आंदोलन दररोज आणि बेमुदत काळासाठी होणार असल्याचा बैठकीत निर्णय घेतला आहे.

हे आंदोलन शांततेत होईल परंतु एकही गाडी पुढे जाणार नाही, असे समाजाने म्हटले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे – पाटील यांनी केलेल्या मागण्या आणि शासनाने दिलेल्या आश्वासनाबाबत अधिवेशनात काहीच झाले नाही. त्यामुळे तालुक्यात पुन्हा आंदोलन सुरू करण्याचा पवित्रा सकल मराठा समाजाने घेतला आहे.

get_footer();