आवृत्ती पुणे
← Back to Homepage

भूममध्ये जल्लोषात ‘तुतारी’ चे स्वागत

Spread the love

भूम : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांना भारतीय निवडणूक आयोगाने तुतारी हे चिन्ह दिले आहे. त्यामुळे ओंकार चौक भूम येथे मोठ्या जल्लोषात प्रत्यक्ष तुतारी वाजवून या चिन्हाचे स्वागत करण्यात आले.

भूम, परंडा, वाशीचे माजी आमदार राहुल मोटे यांनी यावेळी सांगितले की, चिन्ह कोणतेही असु द्या पवार साहेबांचे विचार घराघरापर्यंत पोहचलेले आहेत. युद्धाच्या सुरुवातीला जल्लोषात तसेच कोणतेही शुभ कार्याच्या ठिकाणी तुतारी वाजूनच सुरुवात केली जाते.

हा तुतारी वाजवणारा सामान्य नागरिक असतो. ते एक प्रतिक असते. हे चिन्ह घराघरा पर्यंत पोहचवण्यासाठी कार्यकर्ते सज्ज आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मराठवाडा शरदचंद्र पवार गटाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

फटाके वाजवून यावेळी आनंद साजरा करण्यात आला. पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या सर्व बॅनर वर तुतारी दिसणार आहे.

त्यामुळे या मतदार संघात आता घड्याळ, तुतारी, वाघ, मशाल, पंजा यांचे युद्ध सुरू होणार आहे. यावेळी संजय पाटील, राजेंद्र गाढवे, राजेंद्र गपाट, गणेश साठे, गिलबले, नानासाहेब पाटील, रामेश मस्कार, रहिम शेख, गौरिशंकर साठे, अशोक नलवडे, तालुका अध्यक्ष हनुमंत पाटुळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

get_footer();