आवृत्ती पुणे
← Back to Homepage

भूम ग्रामीण रुग्णालयाला मिळाली किडनी डायलिसिस मशीन

Spread the love

संयोगिता संजय गाढवे यांच्या पाठपुराव्याला यश : संजय गाढवे यांनी केली पाहणी

भुम : आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी भूम येथील ग्रामीण रुग्णालयाला किडनी डायलेसिस मशीन भेट दिली आहेत.

भूम येथे नुकतेच विविध विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य संयोगिता संजय गाढवे यांनी किडनी व डायलिसिससाठी मशीन देण्याची मागणी केली होती.

दीड महिन्याच्या आतच त्यांची ही मागणी पूर्ण करून आरोग्यमंत्री सावंत यांनी किडनी डायलिसिस मशीन ग्रामीण रुग्णालयाला दिली आहेत. डायलीसिससाठी भूम तालुक्यातील रुग्णांना बार्शी, धाराशिव, पुणे, नगर या ठिकाणी जावे लागते परंतु भूम येथील ग्रामीण रुग्णालयात या मशीन आल्यामुळे येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये या मशीन चालू होऊन रुग्णांसाठी उपलब्ध होणार आहेत.

असे यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. नानासाहेब गोसावी यांनी सांगितले. यावेळी माजी नगराध्यक्ष संजय गाढवे, डॉ. कुटे, डॉ. सपकाळ, डॉ. भौरे, हाजी बाबा पटेल, लालू पवार आदी उपस्थित होते.

get_footer();