आवृत्ती पुणे
← Back to Homepage

मनोज जरांगे पाटील यांची पहिली संवाद बैठक भूममध्ये

Spread the love

तिसऱ्या टप्प्यातील आंदोलन सुरू

भूम : मनोज जरांगे पाटील यांनी तिसऱ्या टप्प्यातील आंदोलन सुरू केले असून याची पहिली संवाद बैठक दिनांक ३ मार्च रोजी भूम येथील चौंडेश्वरी सभाग्रहात होणार आहे.

शेहरासह तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आजवर आंदोलन केले आहे. लक्षवेधी आंदोलन आजवर केल्याने जरांगे पाटील यांनी देखील याची दखल घेतली असून याचाच एक भाग म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी तिसऱ्या टप्प्यातील पहिली सवांद बैठक भूम येथील सकल मराठा समाज बांधव यांच्यासोबत करण्यासाठी दिनांक ३ मार्च रोजी शहरात येणार आहेत.

या संवाद बैठकीसाठी सकल मराठा समाज भूम यांच्यावतीने देखील जय्यत तयारी केली असून. शहरासह तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन जरांगे पाटील येणार असल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी या संवाद बैठकीत मध्ये सहभाग नोंदवावा यासाठी बैठका सुरू केल्या आहेत.

दरम्यान आज चौंडेश्वरी सभागृह येथे देखील सकल मराठा समाज बांधव यांनी पाहणी केली असून या सभागृहात देखील महिलावर्ग व पुरुष वर्ग यासह वाहन स्थळ पार्किंग याची देखील व्यवस्था केली असून.

बैठक सुरू झाल्यानंतर ज्या त्या ठिकाणी सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने नियोजन केले आहे. त्याच ठिकाणी महिला व पुरुष यांची आसन व्यवस्था करण्यासाठी स्वयंसेवक निवडण्यात आले असून. नियोजनबद्ध बैठक करण्यासाठी सकल मराठा समाज बांधव यांनी कंबर कसली आहे.

get_footer();