आवृत्ती पुणे
← Back to Homepage

मराठा आंदोलनामुळे उद्धव ठाकरे यांचा धाराशिव दौरा रद्द

Spread the love

भुम : शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा उद्याचा लातूर धाराशिव दौरा रद्द झाला असुन धाराशिव जिल्ह्यात सुरु असलेल्या मराठा आंदोलनामुळे हा दौरा रद्द झाला आहे. आंदोलनचा धसका राजकीय नेत्यांसह प्रशासनाने घेतला आहे.

शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी दौरा रद्द झाल्याची माहिती आहे. आज सकाळ पासुन धाराशिव जिल्ह्यात आंदोलनाचा भडका उडाला आहे. चक्काजाम, रस्ता रोको, ठिय्या आंदोलन, बसवर दगडफेक, टायर जाळपोळ अशी आंदोलन सुरु आहेत.

get_footer();