आवृत्ती पुणे
← Back to Homepage

मराठा आरक्षणासाठी बार्शीतील तरुणाची पुण्यात आत्महत्या

Spread the love

‘फेसबुक लाइव्ह’ करून वाघोलीतील तरुणाचे टोकाचे पाऊल

महाराष्ट्र न्युज नेटवर्क

पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणी साठी वाघोलीतील एका तरुणाने कामाच्या ठिकानी उभारलेल्या टेम्पोच्या लोखंडी पाइपला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली.

बार्शी येथील या तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी पहाटे ‘फेसबुक लाइव्ह’ करून व्यथा मांडली. नंतर चिठ्ठी लिहून ठेवली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रसाद भागवत देठे (वय ३८, रां. वाघोली, मूळ रा. बार्शी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाने नाव आहे.

या प्रकरणात लोणीकंद पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसाद देठे हे मूळचे बार्शीचा राहणारे असून, कटकेवाडी भागातील एका खासगी कंपनीत सुरक्षारक्षकाचे काम करीत होते.

बुधवारी रात्री कामाला गेल्यावर पहाटे त्यांनी आत्महत्येपूर्वी फेसबुक लाइव्ह केले. यानंतर त्यांनी मित्र व नातेवाईकांना मेसेज केले. आपल्या मेव्हण्याला आत्महत्या करीत असल्याचे पहाटे कळविले. पोलीसांना खबर मिळताच पोलीस उपायुक्त विजय मगर, सहायक पोलिस आयुक्त विठ्ठल दबडे, लोणीकंदचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांना आत्महत्या करण्यापूर्वी देठे यांनी लिहिलेली चिठ्ठी सापडली आहे. बुधवारी सायंकाळी लोणीकंद येथील स्मशान भूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली एक मुलगा असा परिवार आहे. सुमारे १५ वर्षापासून ते वाघोलीत वास्तव्यास होते. आरक्षणाचा प्रश्न लोकसभा निवडणुकी नंतर पुन्हा पुढे आला आहे.

get_footer();