आवृत्ती पुणे
← Back to Homepage

मराठा आरक्षणास जाहीर पाठिंबा : राहुल मोटे

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Social News, News, News Slider, Social • June 13, 2024
Spread the love

भूम : मराठा समाज पुर्वीपासून आरक्षणापासून वंचित असल्यामुळे मराठा समाजातील तरूण-तरूणींना प्रत्येक क्षेत्रामध्ये अडचणींचा सामना करावा लागत आहे.

मराठा समाजाला आरक्षणाची असलेली गरज व मराठा आरक्षण बाबतची सकल मराठा समाजाची तीव्र भावना लक्षात घेऊन समस्त मराठा समाजाला न्याय मिळण्यासाठी सरकारने मराठा आरक्षण देणे अत्यंत आवश्यक आहे. अशी मागणी माजी आमदार राहुल मोटे यांनी केली आहे. तसेच मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या मराठा आरक्षण आंदोलनास पाठिंबा जाहीर केला आहे.

मराठा समाज बांधवाला ओ.बी.सी. मध्ये कुणबी मराठा, सगे सोयरे या शब्दाचा आंतरभाव करून लाभ मिळण्यासाठी मी आंतरवली सराठी येथे उपोषणाला बसलेले मराठा समाज आरक्षणाचे जनक व प्रणेते मनोज (दादा) जरांगे-पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनास माझा पूर्ण पाठिंबा जाहीर करत असून आहे.

परांडा भूम वाशी विधानसभा मतदार संघाचे वतीने या आंदोलनास जाहीर पाठिंबा देत असल्याचे पत्रक राहुल मोटे यांनी प्रसिद्धीस दिले आहे. त्यावर त्यांच्यासह समर्थक कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

get_footer();