मराठा आरक्षण अंमलबजावणीसाठी संपूर्ण महाराष्ट्र बंद
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल
भुम : पाच दिवस उलटूनही सरकार अजून त्याची दखल घेत नाही त्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे.
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे आमरण उपोषण सुरु केले आहे. सकल मराठा समाज भूम तालुक्याच्या वतीने आज बंद पुकारण्यात आला होता. बंदला भूम शहरातील व्यापाऱ्यांनी 100% प्रतिसाद दिला. सकाळ पासुन शहरातील मेडिकल वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. तसेंच शाळा आणी कॉलेज मध्ये जाणाऱ्या विद्यार्थी यांची संख्या तूरळक दिसून आली. एस. टी बस सुरुळीत सुरु होत्या पण नागरिकांनी प्रवास करणे टाळल्याचे चित्र होते. तसेच सर्व शासकीय कार्यालये सुरु असूनही नागरिकानी मात्र गावातच राहणे पसंद केल्याने शहरात रस्त्यावर शुकशुकाट दिसून येत होता. तसेच भूम तालुक्यात हा बंद पाळण्यात आला होता. वालवड, पाथरूड, ईट, मानकेशवर ही गावे यात सहभागी झाल्याचे दिसून आले. बंद दरम्यान कोठेही अनुचित प्रकार घडला नसून या बंद दरम्यान भूम पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
