आवृत्ती पुणे
← Back to Homepage

महर्षी आनंद सेवा समाजसेवा पुरस्कार अजित कुंकूलोळ यांना प्रदान

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta, MJW - Social News, MJW Daily News(Post Slider), Other, People, Social • February 1, 2024
Spread the love

बार्शी : पुणे येथील महर्षी आनंद सेवा भक्ती प्रतिष्ठानचा महर्षी आनंद सेवा समाजसेवा पुरस्कार अजित कुंकूलोळ यांना बार्शी येथे श्री वर्धमान जैन स्थानक हॉल येथे प्रदान करण्यात आला.

यावेळी डॉ.अशोककुमार पगारिया, पी.एम. जैन, प्रा. सदाशिव कांबळे, जैनाश्राम आध्यक्ष जयचंद सुराणा, सुरेशचंद्र कुंकूलोळ, डॉ. शांतीलाल रायसोनी, माणिकचंद दुग्गड, चंद्रकांत कोठारी, पदमचंद कांकरिया, भारत कोटेचा, सुरेश सुराणा, मणीलाल बोथरा, बाळासाहेब तातेड आदी उपस्थित होते. यावेळी पगारीया म्हणाले, बार्शीचे समाजभूषण अजित कुंकूलोळ हे समाज सेवत सतत क्रियाशिल असतात. त्यांना आजवर समाजसेवेच्या योगदानाबद्दल या वर्षीचा महर्षी आनंद सेवा समाजसेवा पुरस्कार जाहीर करण्यात आला असल्याचे सांगितले.यावेळी कुंकूलोळ म्हणाले, व्यस्त कार्यक्रमामुळे पुणे येथे होणाऱ्या पुरस्कार कार्यक्रमात सहभागी न होवू शकल्याने दिलगीरी व्यक्त करतो. महर्षी आनंद सेवा भक्ती प्रतिष्ठानचे डॉ. अशोककुमार पगारिया, पी.एम. जैन, प्रा. सदाशिव कांबळे यांनी बार्शी येथे येऊन सन्मानपूर्वक पुरस्कार व ट्रॉफी देवून सन्मान केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

get_footer();