आवृत्ती पुणे
← Back to Homepage

महापालिकेच्या शाळामध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta, MJW - Social News, MJW Daily News(Post Slider), News Slider, Other, Social • January 29, 2024
Spread the love

पुणे : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यानं प्रभागात पुणे महापालिकेच्या विविध शाळा, विविध सोसायटी, गणेश मंडळ ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले.

पुणे : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यानं प्रभागात पुणे महापालिकेच्या विविध शाळा, विविध सोसायटी, गणेश मंडळ ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले.

याप्रसंगी विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध देशभक्तीपर गीते सादर करून सैनिकांना अभिवादन केले. यावेळी शाळेतील शिक्षकांचा व डॉक्टरांचा देखील विशेष सन्मान करण्यात आला. यानिमित्त प्रभागातील नागरिकांसमवेत विविध विषयांवर संवाद साधण्यात आला.
प्रजासत्ताक दिनानिमित्ताने माजी नगरसेवक प्रवीण चोरबेले यांनी सांगितले की, भविष्याची कास धरून अभ्यासाचे नियोजन करावे व उत्कृष्ट गुणवत्ता धारण विद्यार्थ्यांनी करावी. त्यासाठी पालकांनी अतिशय जबाबदारीची भूमिका पार पडावी असे सांगितले. आपण आपल्या राष्ट्रीय ध्वजाचा सन्मान केला पाहिजे. आजचा दिवस संपूर्ण भारतवासीयांसाठी अत्यंत महत्वाचा आणि आनंदाचा असून आजच्या दिवशी आपल्या देशाचे संविधान लागु झाले आणि लोकशाहीच्या माध्यमातून आपल्या सर्वांना सगळे हक्क आणि अधिकार मिळाले. खऱ्या अर्थाने प्रजेच्या हातात सत्ता आली. म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.
यावेळी नगरसेविका मनिषाताई चोरबेले, राजेंद्र सरदेशपांडे, गौरी केंगारे, अनिल भन्साळी, संजय चोरडिया, मयुर कोठारी, सुमित चोपडा, शिवा केगारे, अमित माशाळे, संजय माने, वेंकटेश भंडारे, इर्शाद अली यांच्या शाळेतील शिक्षक वर्ग व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

get_footer();