आवृत्ती पुणे
← Back to Homepage

महाराष्ट्र विद्यालयाच्या योगपटूचे क्रीडा स्पर्धेत यश

Spread the love

बार्शी : महाराष्ट्र विद्यालयाच्या तर्फे आयोजित क्रीडा स्पर्धांमध्ये जिल्ह्यातील ५५ खेळाडूंनी सहभाग घेतला. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र विद्यालयाची योगपटू श्रेया कैलास करळे हीने तृतीय क्रमांक मिळवत उज्वल यश संपादन केले. श्रेयाची शालेय योगासन स्पर्धेत पुणे विभागीय स्तरासाठी निवड झाली आहे.

या सर्व स्पर्धा शिवशक्ती मैदान बार्शी या ठिकाणी पार पडल्या. वरील खेळाडूंची जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक पी.डी पाटील, योगेश उपळकर, विकास पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, उपाध्यक्ष एन. एन. जगदाळे, संस्थेचे सचिव तथा शाळा समितीचे अध्यक्ष पी. टी. पाटील, सहसचिव तथा शाळा समितीचे सदस्य ए. पी. देबडवार, संस्थेचे खजिनदार जयकुमार शितोळे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व्ही. एस. पाटील, बी. के.भालके, सर्व कार्यकारिणी सदस्य, सर्व संस्था सदस्य, विद्यालयाच्या प्राचार्या के.डी.धावणे, उपमुख्याध्यापक आर. बी. सपताळे, पर्यवेक्षक एस. सी. महामुनी, पर्यवेक्षिका एन. बी. साठे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

get_footer();