आवृत्ती पुणे
← Back to Homepage

महाळुंगेत गुंडाचा कोयत्याने सपासप वार करुन खून

Spread the love

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

पुणे : दुचाकीवरून चाललेल्या एका सराईत गुंडाचा दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी कोयत्याने सपासप वार करुन खून केला. ही घटना चाकण-तळेगाव मार्गावर खालुंब्रे हद्दीत सोमवारी सायंकाळी घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार दोन घाव बसल्याने सराईत गुन्हेगार गणेश अनिल तुळवे (वय-31 रा. खालुंब्रे, ता. खेड) याचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. हा प्रकार भावकीतून घडल्याचा संशय आहे.

संशयित आरोपी व त्याचा एक साथीदार फरार झाले आहेत. त्यांच्या शोधासाठी पथके रवाना केली असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त राजेंद्रसिंह गौर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांनी दिली.

गणेश तुळवे हा दुचाकीवरुन त्याच्या भाच्यासह खालुंब्रे येथे त्याच्या घरी चालला होता. तो एचपी चौकापासून काही अंतरावर खालुंब्रेच्या बाजूला जात असताना चाकण – तळेगाव मार्गावर थांबला.

त्यावेळी पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील दोघांनी त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. डोक्यात दोन वार खोलवर गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. गणेश तुळवे हा सराईत गुन्हेगार होता.

त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. तो दोन वर्ष तडीपार होता. काही महिन्यापूर्वी तो गावात आला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी चाकण येथे पाठवला.

घटनास्थळी पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्रसिंह गौर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांनी भेट दिली.

get_footer();