आवृत्ती पुणे
← Back to Homepage

महावीरजयंती निमित्त भूम मध्ये भव्य मिरवणूक

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta, MJW - Social News, MJW Daily News(Post Slider), News, News Slider, Social • April 22, 2024
Spread the love

भूम : भगवान महावीर जयंतीनिमित्त भुम शहरातील जैन बांधवांच्या वतीने रविवारी भव्य मिरवणूक काढण्यात आली.

भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त येथील कसबा जैन मंदिरापासून मिरवणुकीला सुरुवात झाली. बाजार रोड, गोलाई चोक, मेन रोड, नगरपालिका मार्गे ही मिरवणूक निघून कसबा जैन मंदिर येथे विसर्जित करण्यात आली. यावेळी पुरुष, महिला व मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ब्राम्हण संघटनेच्या वतीने पुजा करण्यात आली. भगवान महावीरांच्या उपदेशाप्रमाणे ही मिरवणूक अत्यंत साधी व शिस्तपूर्ण होती.

या मिरवणुकीत अध्यक्ष सुनीलकुमार डुंगरवाल, शितलभाई शहा, अभयकुमार गांधी, विवेक पोकर्णा, स्वप्नील शहा, प्रदीपकुमार आहेरकर, डॉ. शांतीनाथ अंबुरे, बाहुबली एखंडे, राजकुमार आहेरकर, सुदीप महाजन, निलेश शहा, संतोष मुनोत, राजकुमार पितळे, नेमचंद मुनोत, नेमचंद पोकर्णा, विजयकुमार सुरपुरिया, सतीश मनोत, अमोल मुनोत, सचिन गुगळे, संतोष मुनोत, गयाचंद पोकर्णा, नेमीचंद पौखर्णा, सुनील सास्तुरे, आदी जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिरवणूकी दरम्यान भुम तालुका ब्राम्हण संघटना अध्यक्ष सुधीर देशमुख यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी जनसेवा नागरी सहकारी बँकेचे चेअरमन श्रीराम मुळे, शहर अध्यक्ष अॅड. संजय शाळु, माजी नगरसेवक प्रशांत देवडीकर, पत्रकार अरुण देशमुख,सचिन बारगजे, मनोज क्षिरसागर, मयुर शाळु, लक्ष्मीकांत देशमुख, बाबासाहेब वीर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

get_footer();