आवृत्ती पुणे
← Back to Homepage

महावीरांचे विचार आदर्श देश निर्मितीसाठी आवश्यक : प्रवीणऋषिजी म. सा.

Spread the love

गोयल गार्डनमध्ये १४ एप्रिलपासून २१ एप्रिलपर्यंत महावीर गाथेचे आयोजन

पुणे : भगवान महावीरांचे विचार हे आदर्श देश निर्मितीसाठी कसे आवश्यक आहेत. हे समजून सांगण्यासाठी भारताच्या हजारो की.मी.चा पायी प्रवास करून घोर तपस्वी प. पु. प्रवीणऋषिजी म. सा. हे पुण्यात आलेले आहेत.

यांचे उद्बोधक विचार ऐकण्याची संधी सर्वाँना येत्या १४ एप्रिलपासून २१ एप्रिलपर्यंत गंगाधाम-शत्रुंजय रोडवरील गोयल गार्डन येथे ‘महावीर गाथा’ या प्रवचनमालिकेच्या माध्यमातून मिळणार आहे.

भगवान महावीर स्वामी यांनी २६०० वर्षांपूर्वी जे तत्त्वज्ञान मनुष्यासाठी सांगितले जे विचार दिले ते आजदेखील आवश्यक कसे आहेत, महाविरांच्या विचारातून आदर्श देश निर्मिती कशी होऊ शकते आणि संपूर्ण विश्वासाठी हे विचार कसे दिशादर्शक आहेत.

हे या प्रवचन मालिकेतून सर्वाँना समजणार आहे. या विषयी अधिक तपशीलात सांगताना प. पु. प्रवीणऋषीजी म. सा. म्हणाले, भगवान महावीरांनी जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारी सूत्रे आपल्याला सांगितली आहेत, जगामधील सर्व हिंसा थांबू शकते, चारित्र्य निर्मिती मधून देश निर्मिती कशी होऊ शकते अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जी आपल्या आयुष्याला व आपल्या देशाच्या भविष्याला हिताची आहेत.

ती जाणून घेण्यासाठी आपण महावीर गाथा ऐकण्यासाठी येण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. ही महावीर गाथा 14 एप्रिल ते 21 एप्रिल रात्री 8 ते 10 वा. ऐकण्यासाठी शहरातील विविध भागातून बसची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

get_footer();