आवृत्ती पुणे
← Back to Homepage

महा मंगलकारी मंगलपाठाने नव वर्षाची सुरवात

Spread the love

पुणे : “आपल्या घराला मंदिर बनवा आणि घरातील सदस्यांना मंदिरातील देव बनवा, तरच आपले जीवन सुखमय बनेल आणि घरा घरा मध्ये शांती नांदेल. ” असे या प्रसंगी बोलताना उपाध्याय प्रवर प. पु. श्री प्रवीणऋषीजी म. सा. यांनी सांगितले.

श्री वर्धमान श्वेतांबर स्थानाकवासी जैन श्रावक संघ, बिबवेवाडी तर्फे श्री रसिकलाल एम धारिवाल स्थानक भवन (यश लौन्स च्या शेजारी) येथे गुडी पाडवा निमित्त गौतम निधी प्रणेता उपाध्याय प्रवर प. पु. श्री प्रवीणऋषीजी म. सा., प. पु. श्री तिर्थेशऋषीजी म. सा., संथारा प्रेरिका उप प्रवर्तिनी प. पु. श्री सत्य साधनाजी म. सा., उप प्रवर्तिनी प. पु. श्री निर्मलाजी म. सा. आधी ठाणा यांच्या सानिध्यामध्ये नव वर्षाची महा मंगलकारी मंगळपठाचे आयोजन केले होते.

उपस्थितानासंबोधित करताना श्री प्रवीणऋषीजी म. सा. पुढे असेही म्हणाले की आपण घरामध्ये गेल्यावर सर्वांना आपण हवे हवे से वाटलो पाहिजे त्या साठी प्रत्येकाने घरामध्ये प्रवेश करताना अहंकार बाहेर सोडून परिवारामध्ये प्रवेश करावा, परिवारातील लोकांच्या भावना समजून घेऊन त्यांचा आदर करावा, त्यांच्या चुकांना माफ करून सुधारण्यासाठी वेळ द्यावा, बाहेरील लोकांचे कौतुक करता तसेच घरातील लोकांचे कौतुक करा आणि मी भयंकर नाही तर शुभंकर आहे याची जाणीव परिवारातील लोकांना होऊ द्या. या तीन गोष्टींची गुढी प्रत्तेकाने उभारायला पाहिजे.

नव युवकांना आवाहन करताना ते म्हणाले की तुम्ही भविष्य आहेत. तुम्ही स्वतःहून पुढे या आणि भगवान महावीर स्वामींचे दूत बना. घरो घरी, प्रत्येक गल्लीमध्ये भगवान महावीर स्वामींचे दूत झाले पाहिजेत हि काळाची गरज आहे. या प्रसंगी उप प्रवर्तिनी प. पु. श्री सत्य साधनाजी म. सा., व उप प्रवर्तिनी प. पु. श्री निर्मलाजी म. सा. यांनी आपले आशीर्वचनांनी उपस्थिताना लाभान्वित केले.

तर प. पु. श्री तिर्थेशऋषीजी म. सा. यांनी आपल्या सुमधुर कंठाद्वारे गीत गाऊन उपस्थिताना नाव वर्षाच्या शुभेछया दिल्या. या प्रसंगी समाजाच्या सर्व थरातून साधारण २५०० भाविक उपस्थित होती त्यामध्ये प्रमुख पणे श्रीनाथ भिमाले, विजयकांत कोठारी, लखीचंद खिवंसरा, शोभाताई धारिवाल तसेच समाजातील इतर मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी बिबवेवाडी संघाचे उपाध्यक्ष श्री माणिकचंद दुगड यांनी सूत्र संचालन केले व महामंत्री श्री गणेश ओसवाल यांनी सर्व उपस्तीथांचे आभार मानले.


हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री पोपटलालओस्तवाल, माणिक दुगड, रमेशलाल गुगळे, पन्नालाल पितळिया, गणेश ओसवाल, अविनाश कोठारी, प्रकाश गांधी, सुनिल बलाई, चंद्रकांत लुंकड, प्रवीण चोरबोले, कीर्तिराज दुगड, सुभाष बाफना, रमणलाल लुंकड, संपत भटेवरा, चंपालाल नहार, अशोक नहार, रवींद्र दुगड, सुनील दुगड, विजय समदडीया, चंद्रकांत सुराणा, बाळासाहेब कोयाळीकर, रामलाल संचेती तसेच सत्य साधना महिला मंडळाच्या सदस्या व श्रुत बहुमंडळाच्या सदस्यांनी तसेच वर्धमान युथ ग्रुप च्या सदस्यांनी बहूमोल योगदान दिले.

get_footer();