आवृत्ती पुणे
← Back to Homepage

महिलेची ६ वर्षांच्या मुलासह टेरेसवरून उडी मारून आत्महत्या

maharashtra jain warta • Breaking News, Maharashtra News Networks, MNN - Social News, News, News Slider, Other, People, Social • June 19, 2025
Spread the love

पुणे : वैण्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताजे असतानाच, कात्रजमधील आंबेगाव परिसरात एका महिलेने सहा वर्षांच्या मुलासह इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सायंकाळी घडली. महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नंदेच्या छळामुळे आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे.

मयुरी शशिकांत देशमुख (वय ३१) आणि विष्णु शशिकांत देशमुख (वय ६, रा. कल्पक सृष्टी, आंबेगाव) अशी या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मायलेकांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयुरी एका खासगी शाळेत बालवाडी शिक्षिका होत्या.

तिचे पती शशिकांत एका बँकेत नोकरीला आहेत. देशमुख कुटुंबीय मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील असून आंबेगाव बुद्रुक येथील कल्पक सृष्टी सोसायटीत वास्तव्यास आहेत. विष्णू त्यांचा एकुलता एक मुलगा होता.

बुधवारी सायंकाळी सुमारे सहा वाजता मयुरीने इमारतीच्या टेरेसवरून सहा वर्षांचा मुलगा विष्णू याच्यासह उडी मारली. त्यावेळी मयुरीचे पती घरी नव्हते. जोराचा आवाज झाल्यानंतर सोसायटीतील नागरिक बाहेर आले.

तेव्हा मयुरी आणि त्यांचा मुलगा विष्णू हे सोसायटीच्या आवारात रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले. घटनेची माहिती मिळताच आंबेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी घटनास्थळी धाव घेतली.

दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, मयुरी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली. त्या चिठ्ठीत नंदेच्या त्रासामुळे आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी नमूद केले आहे. हा तपास आंबेगाव पोलीस करत आहेत.

get_footer();