आवृत्ती पुणे
← Back to Homepage

महिलेला गुन्ह्याची भिती दाखवून १९ लाखास फसवले

Spread the love

पुणे : तुमच्या नावाने आलेल्या पार्सलमध्ये बेकायदेशीर वस्तू आहेत. त्याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो, अशी भीती दाखवून महिलेस १९ लाख रुपयास फसवण्याचा प्रकार घडला आहे.तुमच्या नावाने आलेल्या पार्सलमध्ये बेकायदेशीर वस्तू आहेत. त्याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो, अशी भीती दाखवून महिलेस १९ लाख रुपयास फसवण्याचा प्रकार घडला आहे.

या प्रकरणी नरपतगिरी चौक, पुणे परिसरात राहणाऱ्या महिलेने पोलिसात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अज्ञात मोबाईल धारक यांनी फिर्यादी यांना कस्टम ऑफिसमधुन व लखनौ पोलीस मधुन बोलत असल्याचे खोटे सांगितले.

फिर्यादीचे नावाने पार्सल पाठविल्याचे व त्यामध्ये बेकायदेशिर वस्तु असल्याचे सांगुन अटक होईल असे सांगुन फिर्यादी यांना विविध बँक खात्यावर पैसे जमा करण्यास सांगुन पैसे परत न देता फिर्यादीची १९,००,०००/- रू ची आर्थिक फसवणुक केली. हा तपास पोलीस निरीक्षक मारुती पाटील करीत आहेत.

get_footer();